Goa Police Dainik Gomantak
गोवा

Goa Police: दादागिरी करणाऱ्या कॉन्स्टेबलची बदली; 2 पोलिस स्थानकात फटाके वाजवून आनंदोत्सव, गोव्यात नेमकं काय घडलं?

Goa Police Constable Transfer: बदली झाल्याच्या आनंदात वाळपई आणि होंडा पोलिस स्थानकातील सहकाऱ्यांनी फटाके वाजवून आनंद साजरा केला.

Pramod Yadav

Goa Police

वाळपई: सहकाऱ्यांवर दादागिरी करणाऱ्या पोलिस कॉनस्टेबलची काही वर्षांच्या कालावधीनंतर बदली झाल्याने दोन पोलिस स्थानकात फटाके वाजवून आनंद साजरा करण्यात आला. वाळपई पोलिस स्थानकातील हा पोलिस कॉन्स्टेबल त्याच्या सहकाऱ्यांवर दादागिरी करायचा, असा आरोप सहकाऱ्यांनी केला आहे.

गृहखात्याने गेल्या काही दिवसांपूर्वी पोलिस कॉन्स्टेबलांच्या बदल्या केल्या यात वाळपईत गेली काही वर्षे जम बसवलेल्या पोलिस कॉन्स्टेबलची देखील बदली करण्यात आली. हा पोलिस कॉन्स्टेबल त्याच्या सहकाऱ्यांवर दादागिरी करत असल्याचा आरोप आहे. दरम्यान, बदली झाल्याच्या आनंदात वाळपई आणि होंडा पोलिस स्थानकातील सहकाऱ्यांनी फटाके वाजवून आनंद साजरा केला.

संबधित पोलिस क़ॉन्स्टेबल सहकाऱ्यांवर दादागिरी करण्यासह त्रास देत होता असा आरोप त्याच्या सहकाऱ्यांनी केला आहे. दरम्यान, गेल्या बदली आदेशात कॉन्स्टेबलची बदली वाळपईतून पर्वरीत करण्यात आली आहे. यामुळे दबाव आणि दहशतीखाली असणाऱ्या या दोन्ही पोलिस स्थानकातील कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

दोन वर्षापूर्वी निधन झालेल्या पोलिस कॉन्स्टेबलचीही बदली

दोन वर्षापूर्वी निधन झालेल्या पोलिस कॉन्स्टेबलची देखील बदली करण्यात आल्याचे आदेशात नमूद करण्यात आले होते. कॉन्स्टेबल सर्वेश गावस यांनी जुने गोवे येथून वाहतूक नियंत्रण कक्षात बदली करण्यात आल्याचे आदेशात नमूद करण्यात आले होते. चूक लक्षात आल्यानंतर खात्याने आदेशात दुरुस्ती केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT