Goa Police News Updates, Hanumant Parab News, Goa Farmer Latest News Dainik Gomantak
गोवा

हिंसाचार केल्याप्रकरणी हनुमंत परबांनी केली DYSP अन् PSI ची तक्रार

त्यांनी माझा फोन घेतला आणि अचानक माझ्या डाव्या डोळ्यावर ठोसा मारला

दैनिक गोमन्तक

वाळपई : सामाजिक कार्यकर्ते हनुमंत परब यांनी मंगळवारी पोलीस उपअधीक्षक सागर एकोस्कर आणि पोलीस निरीक्षक प्रज्योत फडते यांच्या विरोधात वाळपोई पोलीस ठाण्यात विनाकारण मारहाण आणि हिंसाचार केल्याप्रकरणी फौजदारी तक्रार दाखल केली आहे.(Hanumant Parab lodged a complaint against DYSP and PSI for committing violence in goa)

परब यांनी त्यांच्या तक्रारीत म्हटले आहे की, सत्तरी तालुक्यातील पिसुर्ले गावातील सुमारे 150 शेतकर्‍यांना (Farmer) त्यांना त्यांच्या शेतातील गाळ तसेच गावातील बेकायदेशीर खाणकामांमुळे उद्ध्वस्त झालेल्या जलकुंभांमुळे मोठ्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. (Goa Farmer Latest News updates)

11 मार्च रोजी सकाळी 10.30 च्या सुमारास एका जागेवर अनुसूचित जाती- जमाती समुदायातील स्त्री-पुरुषांसह सुमारे 50 शेतकरी उपस्थित होते, तेव्हा अचानक पीआय फडते यांच्या नेतृत्वाखाली एक बस आणि दोन जीपमधून पोलिस (Goa Police) आल्याचे त्यांनी सांगितले. शेतकर्‍यांनी पोलिसांच्या आगमनावर प्रश्न केला असता, पीआयने उत्तर दिले की मामलेदार देखील घटनास्थळी येत आहेत.

परब पुढे म्हणाले की, “मला पोलिस ठाण्यात नेण्यात आले दरम्यान माझ्या पत्नीशी संपर्क साधण्याची परवानगी मागितल्यानंतर मी पत्नीला मुलाला शाळेतून घरी अणण्यास सांगत असताना डीवायएसपी एकोस्कर त्या ठीकाणी आले आणि त्यांनी माझा फोन घेतला. एकोसकरने अचानक माझ्या डाव्या डोळ्यावर ठोसा मारल्याने मला दुखापत झाली. नंतर डीवायएसपी आणि पीआय फडते यांनी मला लाथाबूक्क्यांनी मारहाण केली असल्याचे त्यांनी सांगीतले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT