Hanuman Jayanti  Dainik Gomantak
गोवा

Hanuman Jayanti : रुमडामळ-दवर्लीत भाविकांची मांदियाळी

खडकी, उस्ते, वांते, ठाणे, आंबेडे अशा विविध गावातील मंदिरात उत्सव करण्यात आला.

गोमन्तक डिजिटल टीम

मडगाव : मारुतीनगर, रूमडामळ-दवर्ली येथील श्री मारूती मंदिरात वर्षपद्धतीप्रमाणे श्री हनुमान जयंतीचा उत्सव साजरा करण्‍यात आला. दिवसभर भक्‍तगणांनी मंदिरात श्रींच्‍या दर्शनाचा लाभ घेतला.

दुपारी महाप्रसादाचाही भाविकांनी लाभ घेतला. सायंकाळी ५ वाजता वर्षपद्धतीप्रमाणे काढण्‍यात आलेली मारुतीरायाची दिंडी मंदिरातून निघून विद्युत भवन, राम मंदिर, आकें तळेबांद, तिंबलो निवास, तिर्थरूपा, विद्यानगर जंक्शनवर तसेच होमटावनमार्गे परत मंदिरात अाल्‍यानंतर रात्री आरत्‍या झाल्‍यानंतर तीर्थप्रसादाने उत्‍सवाची सांगता झाली.

Hanuman Jayanti

धावे-ब्राम्हणवाडी सत्तरी येथील श्री हनुमान देवस्थानात आज गुरुवारी सकाळी सूर्योदयाला हनुमान जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. वाळपई शहरातील श्री मारुती मंदिरातही उत्सव मोठ्या दिमाखात साजरा करण्यात आला. खडकी, उस्ते, वांते, ठाणे, आंबेडे अशा विविध गावातील मंदिरात उत्सव करण्यात आला.

खडकीचे मंदिर विद्युत रोषणाई, फुलांनी सजले होते. एकूणच सत्तरी तालुक्यात विविध हनुमान मंदिर, हनुमान जन्मोत्सव मोठ्या भक्तीभावाने साजरा करण्यात आला. यावेळी मारुतींचा जयघोष करण्यात आला. हनुमान प्राथमिक शाळेच्या मुलांनी विविध गीते, श्लोक सादर केले. तसेच मारुती स्तोत्र सादर केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT