Hanuman Jayanti: दरवर्षीप्रमाणे यंदाही गोव्यात सर्वत्र हनुमान जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. पहाटेपासून भाविकांमध्ये हनुमान जन्मोत्सवाचा उत्साह दिसून आला होता. प्रत्येक हनुमान मंदिरात पहाटेपासून श्रीराम जय राम जय जय राम जयघोषाने श्रीराम जन्मोत्सव साजरा करण्यात आला.
(Hanuman Jayanti Celebration In Goa)
दरवर्षी चैत्र महिन्यातील पौर्णिमेला हनुमान जन्मोत्सव साजरा केला जातो. त्यानुसार आज (गुरुवारी) राज्यात प्रत्येक तालुक्यातही हनुमान मंदिरात हनुमान जन्मोत्सव पहाटे साजरा करण्यात आला. राजधानी पणजीसह विविध ठिकाणी भाविकांनी हनुमान दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. तसेच. अनेक ठिकाणी महाप्रसादाचे नियोजन करण्यात आले होते. भाविकांनी महाप्रसादासाठी विविध ठिकाणी हजेरी लावली होती.
मुरगाव तालुक्यातील कुठ्ठाळी, सांकवाळ, झुवारीनगर बिर्ला, कोणसुवा, नवेवाडे, मांगोरहील, नॉन मॉन वास्को, बायणा बीच, गांधीनगर, हेडलॅण्ड सडा आदी ठिकाणी हनुमानजींच्या दर्शनासाठी पहाटेपासूनच मंदिरामध्ये भाविकांची गर्दी उफळली होती.
पहाटे हनुमान पाळणा गीत गाऊन हनुमान जन्मोत्सव साजरा करण्यात आला. त्यानंतर आरती व तीर्थ प्रसादाचा कार्यक्रम झाला. नंतर भजनाचा कार्यक्रम झाला. दुपारी काही ठिकाणी महाप्रसादाचा कार्यक्रम झाला. संध्याकाळच्या सत्रात भजन पालखी मिरवणुका झाल्या नंतर रात्री उशिरा आरती तीर्थ प्रसाद झाला. तसेच सांस्कृतीक कार्यक्रमाची रेलचेल सुरू झाली. दरम्यान हनुमान जन्मोत्सवानिमित्त प्रत्येक मारुतीचे मंदिरे विकृत रोषणाईने तसेच फुलांनी सजवली होती. प्रत्येक मंदीरात श्रींच्या दर्शनासाठी सकाळपासून भाविकांची अलोट गर्दी होती.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.