Arrest Dainik Gomantak
गोवा

Margoa Crime: दारुच्या नशेत सांगलीच्या हमालाचा मुडदा पाडला, नेपाळच्या संशयितास मुंबईतून अटक

Margoa Crime News: वादानंतर दोघांमध्ये झटापटी झाली. सोनारने धारदार बाटली अशोकच्या पोटात खूपसून त्याची हत्या केली.

Pramod Yadav

Margoa Crime News

मडगाव: जुन्या मडगाव रेल्वे स्थानकाजवळ एका हमालाचा खून केल्याची घटना दोन दिवसांपूर्वी उघडकीस आली. या प्रकरणातील नेपाळच्या फरार संशयिताला अटक करण्यात आली आहे. मडगाव पोलिसांनी मुंबईतून त्याला अटक केली. मिरज, सांगली येथील हमालाचा त्यांनं धारदार बाटली खूपसून सोमावारी (दि. २६ ऑगस्ट) हत्या केली होती.

मडगाव पोलिसांनी सुरेश सिंग सोनार (रा. फोंडा, मूळ नेपाळ) असे अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. त्याने मडगाव जुन्या रेल्वेस्थानक परिसरात राजू अशोक कांबळे उर्फ असिफ मोहम्हद नदाफ (३५, मिरज, सांगली महाराष्ट्र) याचा धारदार बाटलीने हल्ला करुन खून केला होता.

संशयित सुरेश सोनार आणि अशोक यांच्यात सोमवारी वाद झाला. वादानंतर दोघांमध्ये झटापटी झाली. सोनारने धारदार बाटली अशोकच्या पोटात खूपसून त्याची हत्या केली. पोलिसांना रक्ताच्या थारोळ्यात पडलेला अशोकचा मृतदेह जुन्या मडगाव रेल्वे स्थानकावर आढळून आला होता.

हत्येनंतर संशयित सोनार घटनास्थळावरुन फरार झाला. मडगाव पोलिस गेल्या दोन दिवसांपासून त्याचा शोध घेत होते. अखेर त्याला मुंबईतून अटक करण्यात आलीय.

दोघांमध्ये किरकोळ कारणावरुन वाद झाला. यावेळी दारुच्या नशेत असणाऱ्या सोनारने हातात असणारी बाटली अशोकच्या डोक्यात फोडली. आणि फुटलेली बाटली त्याच्या पोटात खूपसून त्याचा खून केला. दरम्यान, पोलिसांनी संशयिताला अटक केली असून, अधिक तपास सुरु आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Battle of Galwan: रक्ताने माखलेला चेहरा, हातात धारदार शस्त्र अन् डोळ्यात देशभक्तीची चमक, 'गलवान'मधील सलमानचा पहिला लूक आला समोर

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Video: अप्रतिम अन् शानदार...! भर पावसात मुलांसोबत 'गजराज'नं लुटला क्रिकेटचा आनंद; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

SCROLL FOR NEXT