Goa CM protest video Dainik Gomantak
गोवा

Viral Video: 'प्रमोद सावंत राजीनामा द्या'; कपडे काढून मुरगावात एकजण पावसाच्या पाण्यात लोळला; व्हिडिओ व्हायरल

Pramod Sawant resignation protest: एक संतप्त माणूस पावसाच्या पाण्यात बसून अनोख्या पद्धतीने राज्य सरकारचा निषेध करताना दिसत आहे

Akshata Chhatre

मुरगाव: सध्या गोव्यात एक व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक संतप्त माणूस पावसाच्या पाण्यात बसून अनोख्या पद्धतीने राज्य सरकारचा निषेध करताना दिसत आहे. हा माणूस चक्क पाण्यात लोळत आहे, बोंबाबोंब करत आहे आणि आपले म्हणणे सरकारने ऐकावे यासाठी गयावया करत आहे. या आंदोलनातून त्याने थेट मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

नेमके काय आहे प्रकरण?

हे आंदोलन करणाऱ्या निनावी व्यक्तीच्या एका मित्राला अटक करण्यात आली आहे. पोलिसांकडून त्याला जामीन मिळत नसल्याने हा तरुण प्रचंड संतप्त झाला आहे. त्या व्यक्तीचे म्हणणे आहे की, कदाचित जामीन मिळाला देखील असता, पण कोणीतरी सरकारी वजन वापरून जामीन मिळण्यास अडथळा आणत आहे.

हा आंदोलक पुढे म्हणतो की, "जर एखाद्या बड्या किंवा प्रभावशाली व्यक्तीने काही चूक केली, तर ती पाठीशी घातली जाते. मात्र, सामान्य माणसाची छोटी चूक सुद्धा मान्य केली जात नाही." तो पोलिसांच्या अरेरावी आणि छळाचा आरोप करत आहे. त्याच्या मते, सामान्य माणूस पोलिसांच्या त्रासाला बळी पडत आहे आणि त्याला न्याय मिळत नाहीये.

मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी

आपल्या मित्राला जामीन न मिळाल्याने आणि सरकारी व्यवस्थेतील पक्षपातीपणाचा निषेध म्हणून हा तरुण पावसाच्या पाण्यात बसून हे आंदोलन करत आहे. "मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी त्वरित राजीनामा द्यावा," अशी मागणी त्याने या व्हिडिओतून केली आहे. सामान्य माणसाच्या हक्कासाठी आणि पोलिसांच्या मनमानी कारभाराविरोधात हे आंदोलन असल्याचे तो वारंवार सांगत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kalidasa Pride Story: महाकवी कालिदासाचा गर्व उतरला, आजच्या साहित्यिकांचा कधी? पुरस्कार, सत्कार अन् अहंकारावर परखड भाष्य

PM Kisan 24th Installment: दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट? पीएम किसानचा 24वा हप्ता 'या' दिवशी जमा होणार; पाहा काय आहे अपडेट

VIDEO: समुद्रात तरंगू लागले आयफोन अन् लक्झरी परफ्यूमचे बॉक्सेस! होर्मुझ सामुद्रधुनीत भीषण अपघात; जहाजावरील 21 जणांचा जीव थोडक्यात वाचला

DA Hike: कॅबिनेट बैठकीत DA बाबत मौन! केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता दिवाळीची प्रतीक्षा; महागाई भत्त्यावर अजूनही सस्पेन्स कायम

Pakistan School Tragedy: निष्पाप चिमुकल्यांचा टाहो! पाकिस्तानात शाळेचे छत कोसळून 20 हून अधिक मुलांचा मृत्यू; हॉस्पिटलबाहेर पालकांचा हंबरडा

SCROLL FOR NEXT