Goa POTI Project Dainik Gomantak
गोवा

POTI Project: 'पोती' करणार प्लास्टिक हद्दपार! ‘अर्ज’, घनकचरा व्यवस्थापन मंडळ, मुरगाव पालिकेचा उपक्रम

Goa News: प्लास्टिक वापर रोखण्यासह लैंगिक हिंसाचार पीडित महिलांच्या हाताला हा प्रकल्प कामही देणार आहे

गोमन्तक डिजिटल टीम

वास्को: पर्यावरणाला घातक ठरणारे सिंगल युज प्लास्टिक दैनंदिन जीवनातून हद्दपार करण्यासाठी गोवा वेस्ट मॅनेजमेंट कॉर्पोरेशन (Goa Waste Management Corporation|GWMC), मुरगाव पालिका (Mormugao Municipal Council) आणि ‘अर्ज’ (Anyay Rahit Zindagi) बिगर सरकारी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आज ‘पोती’ या प्रकल्पाची सुरवात करण्यात आली. प्लास्टिक वापर रोखण्यासह लैंगिक हिंसाचार पीडित महिलांच्या हाताला हा प्रकल्प कामही देणार आहे.

आमदार दाजी साळकर यांनी या प्रकल्पाचे उदघाटन केले. यावेळी मुरगावचे नगराध्यक्ष गिरीश बोरकर, नगरसेविका शमी साळकर, नगरसेवक दिलीप बोरकर, गोवा कचरा व्यवस्थापन महामंडळाचे महाव्यवस्थापक नंदन प्रभुदेसाई उपस्थित होते. आमदार साळकर, नगराध्यक्ष बोरकर यांनी मनोगत व्यक्त केले. एचक्यू हॉटेल, प्रेझेंटेशन सोसायटी आणि वास्को लीगल एड सेल यांनी कापडी पिशव्यांसाठी जुने कपडे प्रदान केले.

दीड लाख पिशव्यांचे वाटप

ज्युलियाना यांनी सांगितले की, पोती प्रकल्प दरवर्षी सुमारे ३० हजार किलो सिंगल यूज प्लास्टिकचा वापर रोखेल आणि ५० हजार किलो वापरलेले कपडे वाया जाण्यास प्रतिबंध करेल. हा प्रकल्प २५ महिलांना रोजगार देईल. पाच महिन्यांत सुमारे दीड लाख कापडी पिशव्यांचे वाटप करण्यात येईल.

...असा राबविणार प्रकल्प

गोवा वेस्ट मॅनेजमेंट कॉर्पोरेशनने कियोस्क प्रदान केले आहे.

पालिकेने वास्को फिश मार्केटमध्ये प्रकल्पासाठी जागा दिली आहे.

‘अर्ज’ कडे जुने कपडे गोळा करून पिशव्या पुरविण्याची जबाबदारी आहे.

या प्रकल्पांतर्गत ४-आर (रिफ्यूज, रिसायकल, रिड्यूस, रियूज) धोरण.

प्लास्टिकचा वापर टाळण्यासाठी जुन्या, टाकाऊ कपड्यांचा पुनर्वापर करण्यात येणार आहे.

‘पोती’चे उद्दिष्ट प्लास्टिक पिशव्यांचा बेसुमार वापर रोखून कापडापासून बनविलेली पिशवी मोफत वाटून पर्यावरणाचे रक्षण करणे, हा आहे.
ज्युलियाना लोहार, संचालक, अर्ज.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Origin of Goans: 6000 ईसापूर्व भारतीय पुरुषांचे इराणमध्ये स्थलांतर झाले; गोमंतकीयांच्या मूलस्थानाचा शोध

फोन देण्यासाठी दार उघडले, समोर दिसला मृतदेह; सॉफ्टवेअर अभियंत्याचा हणजूण हॉटेलमध्ये रहस्यमय मृत्यू

Goa Live News: 8 दिवसांत रस्त्याची दुरुस्ती न केल्यास खड्ड्यात 200 काजुची रोपे लावण्याचा ग्रामस्थाचा इशारा

Goan Architecture: ‘नीज-गोंयकारांनो’ जागे व्हा! लादलेल्या प्रोजेक्ट्समुळे पारंपरिक स्थापत्यकलेचा ‘सत्यानाश’ होतोय

Shivaji Maharaj: अफझल खान मारला गेला, त्याचा मुलगा फाजल कराडच्या मशिदीच्या मिनारांमध्ये लपला; प्रतापगडची लढाई

SCROLL FOR NEXT