Sport News Dainik Gomantak
गोवा

Sport News: जीव्हीएम, डीएम्स महाविद्यालयाला बेसबॉलमध्ये विजेतेपद

स्पर्धा ताळगाव पठारावरील विद्यापीठ मैदानावर झाली

गोमन्तक डिजिटल टीम

किशोर पेटकर

गोवा विद्यापीठातर्फे घेण्यात आलेल्या आंतरमहाविद्यालयीन बेसबॉल स्पर्धेत पुरुष गटात फोंड्याच्या जीव्हीएम गोपाळ गोविंद पै रायतूरकर महाविद्यालयाने, तर महिलांत आसगावच्या ज्ञानप्रसारक मंडळ (डीएम्स) महाविद्यालयाने विजेतेपद मिळविले. स्पर्धा ताळगाव पठारावरील विद्यापीठ मैदानावर झाली.

पुरुष अंतिम लढतीत जीव्हीएम महाविद्यालयाने डीएम्स महाविद्यालयास एका होम रनने निसटते हरविले. महिलांत डीएम्सने काणकोणच्या श्री मल्लिकार्जुन व श्री चेतन मंजू देसाई महाविद्यालयास सहा होम रनने पराजित केले. पुरुष गटात 14, तर महिला गटात नऊ महाविद्यालयीन संघांनी भाग घेतला. गोवा विद्यापीठाचे सहाय्यक प्रोफेसर डॉ. नितीन सावंत यांच्या हस्ते बक्षीस वितरण झाले.

स्पर्धेतील विजयी संघ

महिला: डीएम्स महाविद्यालय- कुनिका हरमलकर, समीक्षा राऊळ, रेश्मा राठोड, श्रुती जळगेकर, रश्मी मालवणकर, ऊर्वशी गोवेकर, पूर्वा भाईडकर, रोशनी मयेकर, मेताली गवंडर, आस्था नाईक, प्रतिभा चौहान, अनुशा नाईक, अंजू लाकरा, संजना मालवणकर, मौनेशा कौंडर, रिदा शेख.

पुरुष: जीव्हीएम महाविद्यालय- तनेश गावडे, बिराज गावडे, प्रथमेश नाईक, आयुष मठकर, कमलेश राठोड, यशराज देयकर, सुजय गावडे, तेजस नाईक, संकेत मोरे, मंथन नाईक, आकाश गावडे, शिवम गावस, हेरंब नाईक, मंतेश गावडे, प्रथम वैद्य, जगदेश सोमजी.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: खरी कुजबुज; मुख्‍यमंत्र्यांचा दिल्ली दौरा ‘त्‍या’साठी?

Pilgao: पिळगाव ग्रामस्थ आक्रमक! 'वेदांता'ची वाहतूक रोखली; खनिज गाळामुळे धोका वाढल्याचे आरोप

Goa Crime: ..बऱ्या बोलाने 2 कोटी रुपये द्या! 'वॉल्टर' नावाचा धाक दाखवून व्यावसायिकाकडे खंडणीची मागणी; संशयितांविरुद्ध तक्रार दाखल

Dhirio in Goa: ‘धीरयो’वरून सरकार पेचात! परंपरा की कायदा? आता न्‍यायालयात ‘कसोटी’

Rashi Bhavishya 19 August 2025: नोकरीत बदलाची शक्यता, प्रवासाचे योग; मोठे निर्णय घाईघाईने घेऊ नका

SCROLL FOR NEXT