Nessai Firing Video Dainik Gomantak
गोवा

Nessai Firing Video: नेसायमध्ये गोळीबार! मालमत्ता वादातून रात्रीच्या वेळेस घडली घटना, तिघांविरोधात गुन्हा

गोळ्या झाडल्यानंतर संशयितांनी घटनास्थळावरुन पलायन केले.

Pramod Yadav

Nessai Firing Video: मालमत्ता वादातून नेसायमध्ये गोळीबाराची घटना घडली आहे. बुधवारी (दि.01) रात्री 11 वाजण्याच्या सुमारास घडला ही घटना घडली. गोळ्या झाडल्यानंतर संशयितांनी घटनास्थळावरुन पलायन केले. मायणा-कुडतरी पोलिसांना दोन गोळ्या सापडल्या असून संशयितांविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कॉन्सी फर्नांडिस यांच्या घरासमोर बुधवारी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास गोळीबाराची घटना घडली. संशयित नीलेश वेर्णेकर व अन्य दोघांनी गोळ्या झाडल्याचा संशय आहे. सुदैवाने यात कुणालाही दुखापत झाली नाही.

घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे.

कॉन्सी फर्नांडिस यांच्या घराजवळील जागेत विकासकाम केले जात आहे. त्या बांधकामाविरोधात कॉन्सी यांनी न्यायालयात धाव घेतली असून, याच मालमत्तेच्या वादातून हा प्रकार घडल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

गोळीबार केल्यानंतर संशयित नीलेश वेर्णेकर व दोघेजण घटनास्थळावरुन फरार झाले. संशयित नीलेश वेर्णेकर सुरक्षा एजन्सी चालवतात अशी माहिती समोर आली असून, मायणा-कुडतरी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT