Anjuna Police team with arrested accused Dainik Gomantak
गोवा

Shootout at Siolim Hotel : शिवोलीत हॉटेलमध्ये गोळीबार; तिघांना अटक

संशयित सोझाने गेल्यावर्षीही केले होते असेच कृत्य

Rajat Sawant

Shootout at Siolim Hotel : वाडी-शिवोली येथील एका रेस्टॉरन्टमध्ये पिस्तुलातून गोळी झाडल्याची घटना घडली आहे. हा प्रकार बुधवारी 1 वाजण्याच्या सुमारास वाडी-शिवोली येथील एल पॅत्रोन या रेस्टॉरन्टमध्ये घडला. पोलिसांनी या प्रकरणी तिघा संशयितांना अटक केली आहे.

जून 2022 मध्ये संशयित सोझा याने दारूच्या नशेत पिस्तूलातून गोळी झाडून म्हापशात दहशत माजवली होती. त्यावेळी म्हापसा पोलिसांनी त्याच्यासमवेत दोघा संशयितांना अटक केली होती. 

दरम्यान, राज्यातील स्थानिक लोकांसाठी एक कायदा आणि परप्रांतीय लोकांसाठी विशेष कायदा चालतो काय ? वाडी शिवोलीत मध्यरात्री बारा नंतरही सुरू असलेल्या बारची तसेच ते चालवणाऱ्या परप्रांतीय अक्षीत शेट्टी यांची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे अशी मागणी येथील समर्थन संघटना शिवोली यांनी केली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, वाडी-शिवोली येथील एल पॅत्रोन या रेस्टॉरन्टमध्ये बुधवारी 1 वाजण्याच्या सुमारास संशयित आरोपींचा चार-पाच जणांचा गट आला. संशयित रेस्टॉरन्टच्या बार काऊंटरसमोर उभे राहिल्याने रेस्टॉरन्ट चालक अक्षद शेट्ये यांनी त्यांना बाजूला राहण्याची सूचना केली. 

त्यावरुन संशयितांनी त्यांच्याशी वाद घातला व शिवीगाळ केली. यावेळी त्याच्यातील संशयित जेम्स सोझा याने त्याच्याकडील पिस्तूल काढले व रेस्टॉरन्ट चालकावर पिस्तूलाची गोळी झाडली.

यात सुदैवाने रेस्टॉरन्ट चालक बचावले. तसेच संशयिताने रेस्टॉरन्ट चालक व कामगारांना यावेळी धमकी दिली व तेथून निघून गेला. दरम्यान, रेस्टॉरंट मालकाने या घटनेबाबत बुधवारी हणजूण पोलिसांत तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी संशयितांविरुद्ध भा.दं.सं.च्या 307 कलमांसह बंदूक कायदा व दंगल माजवण्यासह प्राणघातक हल्ल्याचा गुन्हा नोंद केला. 

तक्रारीच्या आधारे म्हापसा पोलिसांनी आरोपींचा शोध घेण्यासाठी पथके नेमली. संशयितांना मोरजी येथे ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले. जेम्स डिसोझा (44) रा. धुळेर बार्देश, मोहम्मद मणियार (29) रा. करासवाडा, बार्देश अशी अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत.

तर गोव्यातून पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेला तिसरा संशयित सूरज सिंग (19) रा. करासवाडा याला थिवी रेल्वे स्थानकावरुन अटक करण्यात आली.

संशयित जेम्स डिसोझा याच्याकडून गोळीबार करण्यासाठी वापरलेले पिस्तूल जप्त करण्यात आले आहे. अटक केलेले तिन्ही संशयित आरोपी पोलीस कोठडीत असून यातील जेम्स याला वैद्यकीय कारणास्तव रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

या प्रकरणाचा तपास एसपी निधिन वाल्सन, एसडीपीओ म्हापसा जिवबा दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली हणजुणे स्थानकाचे पीएसआय तेजेशकुमार नाईक करीत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Operation Sindoor: 'पोस्ट सोडून मुजफ्फराबादला पळा...', ऑपरेशन सिंदूरने थरारले पाकिस्तानी सैनिक; भारतीय लष्करप्रमुखांचा मोठा खुलासा

Viral Video: बर्फाचा डोंगर घेऊन निघाला...! स्कूटी चालकाची धोकादायक स्टंटबाजी, व्हिडिओ पाहून नेटिझन्सही हैराण; तुम्ही पाहिलाय का?

Anant Chaturdashi 2025 Wishes In Marathi: बाप्पा चालले आपल्या गावाला! अनंत चर्तुदशीनिमित्त नातेवाईकांना शेअर करा 'हे' खास WhatsApp Status

बिट्स पिलानीत 20 वर्षीय विद्यार्थ्याने आयुष्य का संपवले? समोर आले कारण Watch Video

Fake IAS Officer: मुख्यमंत्री-राज्यपालांसोबत फोटो, यूपी-बिहार ते गोवापर्यंत पसरले नेटवर्क, कोट्यवधींचा घातला गंडा; बनावट आयएएस अधिकाऱ्याचा पर्दाफाश

SCROLL FOR NEXT