गोव्यात बसून अमेरिकन नागरिकांना गंडा घालण्याऱ्या टोळीचा पर्दाफाश; 9 संशयितांना अटक

माजोर्डातील अडावाडो-किरभाट येथे गुन्हा शाखेची कारवाई
Crime Branch Busts Illegal Call center
Crime Branch Busts Illegal Call centerDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Crime Branch Busts Illegal Call center : गोव्यात बसून अमेरिकन नागरिकांची फसवणूक करणाऱ्या परप्रांतीय टोळीचा गुन्हा शाखेकडून पर्दाफाश करण्यात आला आहे. संशयित माजोर्डातील अडावाडो-किरभाट येथे आरवन हॉलिडे होममध्ये बनावट कॉल सेंटर चालवत होते. याप्रकरणी 9 संशयितांना अटक केली असून 15 लाखांचे साहित्य जप्त केले.

Crime Branch Busts Illegal Call center
Kadamba Bus Service: प्रवासी विसरला पण बसवाहक जागला...वाचा विशेष वृत्त

याबाबत अधिक माहिती अशी की, संशयित माजोर्डातील अडावाडो-किरभाट येथे आरवन हॉलिडे होममध्ये बनावट कॉल सेंटर चालवून अमेरिकन नागरिकांची फसवणूक करीत होते.

याप्रकरणी विनय माखवान (32, अहमदाबाद गुजरात), घाची अल्फारझ (28, गुजरात), आकाश बिस्वास (23, शिलाँग, मेघालय), आकाश सुनार (23, मेघालय), केसंग तमंग (22, प. बंगाल), राहूल सरसार (29, मुंबई), अजय बिस्वास (25, मेघालय), तन्मय दासगुप्ता (20, नागालँड) व रेहान शेख (27, मुंबई) या संशयितांना अटक करण्यात आली आहे.

9 संशयितांकडून हेडफोनसह 9 लॅपटॉप, 9 राऊटर, 2 मॉडेम, 9 मोबाईल फोन, ॲक्सेसरीज केबल्स आणि 65 हजारांची राेकडसह 15 लाखांचा ऐवज जप्त केला.

गुन्हा करण्याची पद्धत...

या संशयितांनी एक्स-लाईट नावाच्या ॲपवरून लॅपटॉपच्या मदतीने व्हीपीएनचा (वर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्क) वापर करून अमेरिकेतील नागरिकांचा डाटा मिळवला. त्यानंतर त्यांनी प्रत्येकाला कॉल करून ते युनायटेड स्टेटच्या बँकेचे अधिकारी असल्याचे भासवून त्यांना गंडवू लागले.

ज्यांचे बँकेत कमी पैसे आहेत, त्यांना ते कर्ज देत असल्याचे सांगत होते. तुमचा क्रेडिट स्कोअर कमी असल्याने दंड भरा, असे सांगून त्यांच्याकडून पैसे उकळण्यास सुरवात केली. गुगल पेद्वारे ते पैसे ट्रान्सफर करण्यास सांगायचे. पैसे ट्रान्सफर झाल्यानंतर त्याचे भारतीय चलनात रूपांतरण करून घ्यायचे. काही नागरिकांनी भीतीनेच हे पैसे ट्रान्स्फर केले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com