Morlem Ghodemodni  Dainik Gomantak
गोवा

Ghodemodni: गुळ्ळे, मोर्ले येथे रंगणार आठ घोड्यांची घोडेमोडणी! ‘भरणूल’ लोककला प्रकाराचे होणार सादरीकरण

Ghodemodni Morlem: सत्तरी तालुक्यातील मोर्ले कॉलनी हा अंजुणे धरणाच्या स्थलांतराचा भाग. मोर्ले कॉलनी येथे सध्या तीन गाव आहेत.

Sameer Panditrao

वाळपई: सत्तरी तालुक्यातील मोर्ले कॉलनी हा अंजुणे धरणाच्या स्थलांतराचा भाग. मोर्ले कॉलनी येथे सध्या तीन गाव आहेत. गुळ्ळे, अंजुणे व पणसुली. रविवार, १६ रोजी या गावात घोडेमोडणी साजरी करण्यात येणार आहे. या तिन्ही गावाचे घोडे मिळून श्री सातेरी केळबाय मंदिर गुळ्ळे येथे नाचतात. गुळ्ळेचे पाच, अंजुणेचे दोन तर पणसुलीचा एक घोडा असे मिळून एकूण आठ घोडे एकत्र येतात व श्री सातेरी केळबाई मंदिर गुळ्ळे येथील घोडेमळावर खेळले जातात.

दरम्यान, ही घोडेमोडणी नाचण्याची पद्धतही गोमंतकातील इतर घोडेमोडणीपेक्षा खूपच वेगळी व कठीण आहे. आज रात्री नऊ-दहा वा.दरम्यान या घोडेमोडणीला सुरुवात होणार आहे. ते रात्री उशीरा

दोन-तीन वाजेपर्यंत नाचणार आहेत. नंतर चव्हाटा मंदिरात जाऊन देवकार्य केल्यानंतर, केळबाई मंदिराच्या आवारात सांगता केली जाईल. त्यानंतर, कौल घेऊन न्हावन व महाप्रसाद भक्तांना वाढला जाईल.

सातव्या दिवशी म्हणजेच बुधवार, १९ मार्च रोजी लोकजीवन, लोकसंस्कृती यावर प्रकाशज्योत टाकणारे गद्य विभागातील लोकनाट्य म्हणजेच ‘भरणूल’ यासारखा लोककला प्रकार साजरा केला जाणार आहे. हा लोककला प्रकार आपल्याला गोमंतकातील एकमेव गुळ्ळे गावात पाहायला मिळतो.

पारंपरिक खेळांचा समावेश

ठाणे-सत्तरीनंतर गोमंतकात मोठी संख्या असलेला घोडमोडणी उत्सव म्हणजे या गुळ्ळे गावातील. जती-सकारतींनी परिपूर्ण तसेच चोर, करवली, धोंड, घोडेमोडणी, फूल, भरणूल अशा विविध पारंपरिक खेळांनी समृद्ध गुळ्ळे, सत्तरी गावचा शिमगोत्सव आहे. गोमंतकात जास्तीत जास्त आठ घोड्यांची घोडेमोडणी गुळ्ळे गावाची असून घोड्यांच्या संख्येने गोमंतकात तिचा दुसरा क्रमांक लागतो. ठाणेनंतर जास्त घोडे असलेली ही घोडेमोडणी आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Canada Technology Deal: भारत-कॅनडा टेक डील! विद्यार्थ्यांना मिळणार एआय आणि डेटा सायन्सचे धडे, बंगळुरुमध्ये दीपस्पेशियलचे दोन मोठे करार

Goa Regional Development: गोव्याचे भौतिकशास्त्र आणि राज्यशास्त्र! कॅसिनो, खाणउद्योग अन् विकासाच्या राजकारणाचा वेध

प्रयत्ने साखरेचे कण वेचिता... तक्रारी सोडा, आनंदाचे क्षण निवडा; सुखी आयुष्याचा सुंदर मंत्र!

Egypt Tourism: इजिप्तचा गूढ वारसा! पिरॅमिड्सपासून नाईल नदीपर्यंत; इतिहास, संस्कृती अन् आधुनिकतेचा अद्भुत संगम

JNU Global Reputation: जेएनयूच्या पाण्यात काय आहे?

SCROLL FOR NEXT