Goa  Dainik Gomantak
गोवा

Swaympurna Goa|‘स्वयंपूर्ण गोवा’ जाणण्यासाठी गुजरातचे अधिकारी गोव्यात

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सुरू केलेला स्वयंपूर्ण गोवा 2.0 उपक्रम हा इतर राज्यांमध्येही लोकप्रिय झाला आहे.

दैनिक गोमन्तक

पणजी: मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सुरू केलेला स्वयंपूर्ण गोवा 2.0 उपक्रम हा इतर राज्यांमध्येही लोकप्रिय झाला आहे. हा उपक्रम नेमका काय आहे हे समजून घेण्यासाठी गुजरात सरकारचे वरिष्ठ अधिकारी तथा अतिरिक्त विकास आयुक्त आणि साहाय्यक विकास आयुक्त, गुजरात सरकार एन. आर. पटेल यांनी राज्याला भेट दिली आहे.

(Gujarat officials in Goa to know 'Swayampurna Goa')

नियोजन, सांख्यिकी आणि मूल्यमापन संचालनालयाचे संचालक यांनी गुजरात सरकारच्या अधिकाऱ्यांचे स्वागत केले. स्वयंपूर्ण गोवा 2.0 उपक्रमाची संकल्पना, तो कसा सुरू केला, अंमलबजावणी आणि उपक्रमाची एकूण परिणाम कसे झाले, हे त्यांनी समजावून सांगितले. गुजरात सरकारच्या अधिकाऱ्यांनी पंचायत सचिव कार्यालयाला भेट दिली. मिनीन डिसोझा, स्वयंपूर्ण मित्र सुराज काणेकर आणि नॅन्सी फर्नांडिस यांनी गुजरातमधील अधिकाऱ्यांशी संवाद साधला. स्वयंपूर्ण मित्रांनी त्यांच्या पंचायतीमध्ये स्वयंपूर्ण गोवा उपक्रमाच्या विविध टप्प्यांवर त्यांच्या क्षेत्रातील अनुभव, समस्या आणि आव्हानांची माहिती दिली. नंतर या अधिकाऱ्यांनी साल्वादोर दु मुंद ग्रामपंचायतीला भेट दिली.

उपसरपंच दत्ताराम रेडकर यांनी या अधिकाऱ्यांचे स्वागत केले. स्वयंपूर्ण गोवा उपक्रमात पंचायतीने सक्रिय सहभाग कसा घेतला आणि त्याचा ग्रामपंचायतीच्या जनतेला कसा फायदा झाला हे उपसरपंचांनी त्यांना समजावून सांगितले. स्वयंपूर्ण गोवा उपक्रमांतर्गत राज्यातील कल्याणकारी योजना प्रत्येक लाभार्थीपर्यंत पोहोचेल याची खात्री करण्यावर जास्तीत जास्त भर देणे हे ध्येय आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT