Goa Crime|अत्याचारांत बहुतांश अल्पवयीन ‘शिकार’

अहवालानुसार गोव्यातील लैंगिक अत्याचाराच्या पीडितांपैकी सुमारे 66.21 टक्के अल्पवयीन मुलींचा समावेश असून, ही बाब चिंताजनक आहे.
Goa Crime News
Goa Crime NewsDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: राष्ट्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने 2021 साली जारी केलेल्या अहवालातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. अहवालानुसार गोव्यातील लैंगिक अत्याचाराच्या पीडितांपैकी सुमारे 66.21 टक्के अल्पवयीन मुलींचा समावेश असून, ही बाब चिंताजनक आहे.

(Minors are mostly 'victims' in atrocities in goa state)

Goa Crime News
Sonali Phogat Case: सोनालींच्या पीए सांगवानने नेमलेल्या ‘त्या’ संगणक ऑपरेटरचा शोध सुरू

2021 मध्ये गोव्यात लैंगिक अत्याचाराच्या 72 गुन्ह्यांमध्ये 74 जणांचे प्राण वाचले आहेत. त्यापैकी 49 मुली अल्पवयीन आहेत, अशी आकडेवारी एनसीआरबीने अहवालात दिली आहे. राज्यात 52 अपहरण प्रकरणे, 40 दंगलीचे गुन्हे, 27 चोरी, 1 दरोडे, 9 जाळपोळ, 121 एनडीपीएस, 26 खून प्रकरणे व 74 महिलांचा विनयभंग करण्याच्या हेतूने अत्याचाराचे गुन्हे दाखल आहेत.

अनेक प्रकरणांत ‘जवळचेच’ संशयित

अहवालातून समोर आले की, आरोपी पीडितांना पूर्वीपासून ओळखत होते. 68 म्हणजे सुमारे 94.4 टक्के आरोपी व पीडित यांची ओळख होती. आरोपींपैकी 9 कुटुंबांतील सदस्य आहेत, 46 आरोपी मित्र व ऑनलाईन मित्र आहेत. लग्नाच्या किंवा विभक्त पतीच्या बहाण्याने लिव्ह इन जोडीदारही आहेत. 13 आरोपी हे कौटुंबिक मित्र, शेजारी, इतर ओळखीच्या व्यक्ती आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com