Goa Police Dainik Gomantak
गोवा

Goa Police: गोवा पोलिसांना गुन्हेगारांच्या शोधासाठी गुजरातनिर्मित सॉफ्टवेअरची मदत

‘पथिक’ या सॉफ्टवेअरमुळे हॉटेल व गेस्ट हाऊसमध्ये पर्यटक म्हणून राहणाऱ्या गुन्हेगारांचा शोध घेणे सोपे होणार आहे.

दैनिक गोमन्तक

Goa Police: गुजरातमधील अहमदाबाद सिटी पोलिसांनी तयार केलेल्या ‘पथिक सॉफ्टवेअर’चा वापर गोवा पोलिस लवकरच करणार आहेत. या सॉफ्टवेअरमुळे हॉटेल व गेस्ट हाऊसमध्ये पर्यटक म्हणून राहणाऱ्या गुन्हेगारांचा शोध घेणे सोपे होणार आहे.

विदेशी पर्यटकांना सी फॉर्म भरणे सक्तीचे आहे. हॉटेल व गेस्ट हाऊसमालकांनी त्यांना तो 24 तासांत भरण्यास सांगावे. त्यामुळे बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्या विदेशी नागरिकांची माहिती मिळवण्यास पोलिसांना सोपे होणार आहे, अशी माहिती पोलिस महासंचालक जसपाल सिंग यांनी दिली.

आल्तिनो-पणजी येथील राजपत्रित अधिकाऱ्यांच्या सभागृहात राज्यातील हॉटेल व गेस्ट हाऊसमालकांना पथिक सॉफ्टवेअरची माहिती देण्यासाठी सिंग यांनी काल बैठक बोलावली होती. या बैठकीस हॉटेल व गेस्ट हाऊसचे मालक उपस्थित राहिले.

यावेळी त्यांनी हे सॉफ्टवेअर सुरक्षिततेच्या दृष्टीने किती महत्त्वाचे आहे, याची माहिती दिली. हे सॉफ्टवेअर गुजरात पोलिसांनी निर्माण केले असून त्यांनी त्याचा वापर करण्यास सुरुवात केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: बिहारमधून दिसू लागला हिमालय आणि माऊंट एव्हरेस्ट; मनमोहक व्हिडिओ आला समोर Watch

Goa Politics: आमदार भाजपमध्ये जाणार नाहीत याची गॅरंटी द्या! ‘आप’चा काँग्रेससोबत युतीस स्पष्ट नकार

Shubhman Gill: "त्यांनी भारताला स्वबळावर अनेक सामने जिंकून दिले, आम्हाला त्यांची गरज..." नवा कर्णधार शुभमन गिलचे रोहित-विराटबाबत मोठं वक्तव्य

IND vs WI 2nd Test: टीम इंडियाला धक्का, दिल्ली कसोटीत जसप्रीत बुमराहच्या खेळण्यावर सस्पेन्स, 'या' खेळाडूला संधी मिळू शकते

Goa Live News: गोवा पोलिसांच्या वाहनाची कारला धडक, सुदैवाने जीवीतहानी टळली; म्हापसातील घटना

SCROLL FOR NEXT