Gujarat governor Acharya Devvrat Dainik Gomantak
गोवा

Governor Devvrat: रासायनिक शेतीमुळे उत्तर भारत विनाशाकडे जातो आहे

राज्यातील शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीकडे वळण्याची गरज

दैनिक गोमन्तक

पणजी: गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत सध्या गोवा दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी राज्यात सेंद्रिय शेतीची गरज असल्याचे म्हटले आहे. नैसर्गिक उत्पादनांचा वापर करून शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीसाठी प्रयत्न केले पाहिजेत असे ते म्हणाले. राज्यपाल देवव्रत गोवा कृषी संचालनालयाने राजभवनात एक कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी बोलत होते.

(Gujarat governor Acharya Devvrat said must goa farmers organic farming )

गुजरात राज्यपाल देवव्रत (Gujarat governor Acharya Devvrat )हे सेंद्रिय शेतीचे समर्थक आहेत. तसेच अभ्यासक म्हणूनही ओळखले जातात. त्यांनी सांगितले की, सेंद्रिय शेतीची ( organic farming ) संकल्पना गतीमान करण्यासाठी आणि कृषी विस्तारक, शेतकरी समुदाय यांच्यामध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी सेंद्रिय शेतीला चालना मिळणे आवश्यक आहे.

आपलं उदाहरण देत देवव्रत म्हणाले “माझ्याकडे हरियाणामध्ये 200 एकर जमीन आहे. जिथे नव नवे प्रयोग करत असतो. जगभरातील शास्त्रज्ञ म्हणतात की रासायनिक शेती 24% ग्लोबल वार्मिंगसाठी जबाबदार आहे आणि 0.5% पेक्षा कमी कार्बनिक कार्बन जमिनीसाठी हानिकारक आहे. परिणामी, रासायनिक शेतीमुळे उत्तर भारत विनाशाकडे जात आहे.

या कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री प्रमोद सावंत म्हणाले की, गोवावासीयांनी आपल्या मुळ शेतीकडे परतण्याची गरज असून आत्मनिर्भर भारत आणि स्वयंपूर्ण गोवा यातुन दुग्धव्यवसाय, फलोत्पादन, मत्स्यपालन आणि मत्स्यव्यवसाय क्षेत्रात प्रगतीसाधला येईल. तसेच हळूहळू कमी होत असलेल्या हिरव्या भाज्यांच्या देशी प्रकारांसह स्वतःचे पीके वाढवण्यावर लक्ष केंद्रित केल्यास फलोत्पादन महामंडळ भाजीपाल्यांसाठी इतर राज्यांवर अवलंबून राहणे थांबवू शकते अन् गोवा याबाबतीत स्वावलंबी होऊ शकतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT