Guirim Mapusa Sarpanch Booked under Rape Charges Dainik Gomantak
गोवा

Guirim Mapusa Crime Case: लग्नाचे आमिष दाखवून 21 वर्षीय युवतीवर बलात्कार, गिरीच्या सरपंचावर गुन्हा

अत्याचाराचा प्रकार मागील वर्षभरापासून सुरू होता. असे तक्रारीत नमूद केले आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Guirim Mapusa Sarpanch Booked under Rape Charges: लग्नाचे आमिष दाखवून 21 वर्षीय युवतीवर बलात्कार केल्याप्रकरणी गिरी गावच्या सरपंचाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. म्हापसा पोलिस स्थानकात याप्रकरणी पीडित युवतीने तक्रार दाखल केलीय.

सनी नानोडकर असे गुन्हा दाखल झालेल्या सरपंचाचे नाव आहे. त्याच्याविरोधात भारतीय दंड संहिता कलम 376 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार,पीडित युवतीने मंगळवारी याप्रकरणी म्हापसा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. एका खासगी कार्यालयात कामाला असणाऱ्या या युवतीवर लग्नाचे आमिष दाखवून वारंवार अत्याचार केला. अत्याचाराचा प्रकार मागील वर्षभरापासून सुरू होता. असे तक्रारीत नमूद केले आहे.

पीडित युवतीला धमकावण्यास सुरूवात केल्याने घाबरलेल्या युवतीने मंगळवारी म्हापसा पोलिस स्थानकात तक्रार दाखल केली. पोलिसांकडून सध्या संशयित नानोडकर याचा शोध सुरू आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lessons from Animals: प्राण्यांकडूनही शिकता येतात जीवनाचे धडे! मुंग्यांची शिस्त, पक्ष्यांची मेहनत अन् निसर्गाची जादू

Bangladesh Resort Fire: बांगलादेशात रिसॉर्टला भीषण आग, 10 जणांचा होरपळून मृत्यू; जीव वाचवण्याची संधीच मिळाली नाही VIDEO

Trigrahi Yog 2026: ग्रहांच्या फेरबदलाचा मोठा चमत्कार! त्रिग्रही आणि बुधादित्य योगाच्या संयोगाने उजळणार 3 राशींचे भाग्य; होणार अफाट धनलाभ

INS Samarthak Warship: भारताची पहिली बहुउद्देशीय युद्धनौका 'समर्थक' नौदलात दाखल; सागरी सुरक्षा होणार अधिक मजबूत!

Hero च्या दोन नव्या बाइक्स लॉन्च! किंमत 1.27 लाखांपासून सुरू, क्रूझ कंट्रोलसह मिळणार अनेक भन्नाट फीचर्स

SCROLL FOR NEXT