साखळी: हिंदू वर्षाचा पहिला दिवस म्हणजे गुढी पाडवा. आज गोव्यातील विविध ठिकाणी कार्यक्रमांची रेलचेल सुरु आहे आणि साखळीत देखील गुढी पाडव्याचा सण अगदी हर्ष-उल्हासात साजरा करण्यात आला. साखळीतील नववर्ष स्वागत समितीकडून मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते. या मिरवणुकीत साखळी वासियांनी मोठ्या संख्येत उपस्थिती दर्शवली, विशेष म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री आणि साखळीचे आमदार डॉ. प्रमोद सावंत देखील या मिरवणुकीत सहभागी झाले होते.
गुढी पाडव्यानिमित्त आयोजित केलेल्या या कार्यक्रमात स्थानकांना संबोधित करताना मुख्यमंत्र्यांनी हा नवीन संकल्प करण्याचा संकल्पदिन असून या दिवशी आपल्या निरोगी आरोग्य, सुख व समृध्दीची गुढी प्रत्येकाने उभारावी असं वक्तव्य केलं.
हे नवीन वर्ष सर्वांसाठी सुखाचं, भरभराटीचं आणि विशेष करून आरोग्यदायी जावं असं म्हणत त्यांनी सर्वांना नवीन वर्षाचा शुभेच्छा दिल्या.
गुढी पाडव्याचे औचित्य साधून त्यांनी आरोग्य जपणं किती महत्वाचं आहे यावर भर दिला.आपण फक्त जिभेची चव पूर्ण करतोय, मात्र शरीराला काय हवंय याकडे दुर्लक्ष होत आहे. वर्ष १९६१ पूर्वी गोव्यात कुणालाही डायबिटीसचा आजार नव्हता मात्र आज सर्वांच्या शरिरातील साखरेचे प्रमाण हे वाढत चालले आहे आणि शरीरातील साखर वाढल्याने अनेक आजार वाढत आहेत.
आज आपल्या आरोग्याला आवश्यक गोष्टी न खाता आपल्या जीभेला पाहिजे ते खात असल्याने त्याचे दुष्परिणाम आरोग्याला सहन करावे लागतात याकडे गांभीर्याने लक्ष देत आरोग्य निरोगी ठेवण्याची व सुख समृध्दीचा संकल्प करावा असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी साखळीत केले.
साखळी नववर्ष स्वागत समितीतर्फे साखळी बाजारात ध्वजपूजन झाल्यानंतर मंगलयात्रा काढण्यात आली. या यात्रेत मुख्यमंत्र्यांनी सहभगी होऊन सर्वांना गुढीपाडवा व नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.