Goa theft news Dainik Gomantak
गोवा

Dona Paula Crime: पणजीत चोरट्यांचा धुमाकूळ!! सुरक्षा रक्षकाला मारहाण; वृद्ध दाम्पत्याला बांधून लाखोंचा ऐवज लंपास

Panaji Robbery News: तीन सशस्त्र दरोडेखोरांनी घरात घुसून ७७ वर्षीय जयप्रकाश धेम्पो आणि त्यांच्या ७१ वर्षीय पत्नी पद्मिनी यांना पलंगाला बांधून ठेवले आणि घरातील मौल्यवान वस्तू लुटून नेल्या

Akshata Chhatre

पणजी: दोना पावला येथे रविवारी ( दि. २०) मध्यरात्री गोव्यातील एका प्रतिष्ठित कुटुंबातील वृद्ध दांपत्याला दरोड्याचा सामना करावा लागला. तीन सशस्त्र दरोडेखोरांनी घरात घुसून ७७ वर्षीय जयप्रकाश धेम्पो आणि त्यांच्या ७१ वर्षीय पत्नी पद्मिनी यांना पलंगाला बांधून ठेवले आणि घरातील मौल्यवान वस्तू लुटून नेल्या. ही धक्कादायक घटना मध्यरात्री १२ ते पहाटे ४ च्या दरम्यान घडली.

इंग्रजी वृत्तपत्र टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या माहितीनुसार दरोडेखोरांनी बंगल्यात प्रवेश करण्यापूर्वी सुरक्षा रक्षकाला मारहाण केली आणि घरात घुसताच धेम्पो यांच्या पत्नी पद्मिनी यांना पलंगाला बांधलं आणि त्यानंतर जयप्रकाश यांना देखील पलंगाला बांधून ठेवलं. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जयप्रकाश यांनी तीन अज्ञात व्यक्तींना त्यांच्यासमोर उभं पाहिलं होतं.

गुन्हा घडला त्यावेळी बंगल्यात केवळ हे वृद्ध दांपत्यच होतं. घटनेनंतर दरोडेखोर मौल्यवान ऐवज घेऊन फरार झाले. सकाळी घरकाम करणाऱ्या बाई घरात आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. त्यांनी तात्काळ वृद्ध दांपत्याला सोडवलं आणि पोलिसांना घटनेची माहिती दिली.

गोवा पोलिसांकडून दरोडेखोरांनी नेमका किती किमतीचा ऐवज लुटला याची तपासणी सुरू आहे, पण हा आकडा लाखांमध्ये असण्याची शक्यता वर्तवली जातेय.

पणजी पोलिसांनी आरोपींची ओळख पटवण्यासाठी परिसरातील सर्व सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी सुरू केली आहे. अज्ञात व्यक्तींविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आलीये आणि आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांनी मोठी शोध मोहीम सुरू केली आहे.

पोलिसांनी सांगितले की, सुदैवाने सशस्त्र दरोडेखोरांनी वृद्ध दांपत्याला कोणतीही शारीरिक इजा पोहोचवली नाही. मात्र, सुरक्षा रक्षकाला मारहाण झाली असून त्याला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळावरून मिळालेल्या फिंगरप्रिंट आणि फॉरेन्सिक तज्ञांनी महत्त्वाचे पुरावे गोळा केले असल्याची माहिती उत्तर गोव्याचे पोलीस अधीक्षक अक्षत कौशल यांनी दिली तसेच लवकरच या आरोपींना पकडून शिक्षा केली जाईल असे आश्वासन पोलीस उपमहानिरीक्षक वर्षा शर्मा यांनी टाईम्स ऑफ इंडियाशी बोलताना दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: माजी पर्यटनमंत्र्यांना 13 लाखांचा गंडा, आर्थिक व्यवहारातून फसवणूक; दोघांविरोधात तक्रार नोंद

Ganesh Chaturthi: वय वर्षे 84, तरीही गणरायाची सेवा; वयाच्या 10व्या वर्षांपासून जोपासली आहे मूर्तिकलेची आवड

Goa Live News: मरड-धारबांदोडा येथील बेकायदेशीर चिरे खाणीवर छापा!

Bear Attack Quepem: चिंताजनक! अस्वलाने केला प्राणघातक हल्ला, केपेतील शेतकरी गंभीर जखमी

Goa Politics: सोमवारी होणार खातेवाटप, दामू नाईकांची स्पष्टोक्ती; अमावस्येमुळे निर्णय लांबल्याचा निर्वाळा

SCROLL FOR NEXT