Dona Paula: दोना पावला येथील ‘राजीव गांधी आयटी’ची जागा लाटण्याचा डाव उद्ध्वस्त; प्रख्यात व्यावसायिकाच्या मनसुब्यांवर 'पाणी'

Dona Paula IT land: प्राप्त माहितीनुसार आयटी विभागाने मामलेदार व सरकारी खात्याच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत अतिक्रमणाच्या ठिकाणी नोटीस चिकटवली होती.
Dona Paula IT land
Illegal construction removed from Dona Paula IT reserved landDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: दोना पावला येथील ‘राजीव गांधी आयटी’ साठी आरक्षित केलेली जागा एका प्रख्यात व्यावसायिकाकडून लाटण्याचा डाव माहिती-तंत्रज्ञान, इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन विभागाने (डीआयटीई ॲँड सी) सोमवारी हाणून पाडला. मिळालेल्या माहितीनुसार एका व्यावसायिकाने याठिकाणी अतिक्रमण करून त्याठिकाणी उद्यान उभारण्याचे काम सुरू केले होते, ही बाब लक्षात आल्यानंतर माहिती-तंत्रज्ञान खात्याने पोलिसांच्या मदतीने कारवाई केली.

सुमारे २५ हजार चौरस मीटर जमीन माहिती-तंत्रज्ञान विभागाची आहे. दोना पावला-बांबोळी या रस्त्याच्या दुतर्फा ही जागा आहे. या जागेला संरक्षक भिंत आहे. रस्त्यावरून दिसणार नाही अशा उतरणीच्या दक्षिण बाजूच्या जागेत एका शेडची व एक इमारतीची उभारणी करून त्याभोवती संरक्षक संरक्षक भिंतीची उभारणी केली गेली होती. बेकायदेशीरपणे ताब्यात घेतलेल्या जागेवर उद्यानाची निर्मिती केली जात होती. येथील शेडमध्ये मशिनरी आणि अनेक बॉक्स होते.

प्राप्त माहितीनुसार आयटी विभागाने मामलेदार व सरकारी खात्याच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत अतिक्रमणाच्या ठिकाणी नोटीस चिकटवली होती. आज सकाळी आयटी विभागाने पोलिस बंदोबस्तात ते कारवाईस सुरुवात केली.

Dona Paula IT land
Land Conversion: ‘नगर नियोजन’च्या 5 अधिसूचनांना स्थगिती! गोवा खंडपीठाचे निर्देश, प्रतिवाद्यांना नोटीस

अतिक्रमण काढताना कोणीही त्याला अटकाव केला नाही. जेसीबीच्या साह्याने संरक्षक भिंत पाडली. तसेच एक मोठे शेडही हटवले. विशेष म्हणजे उद्यानाच्या कामासाठी आणलेले साहित्य तिथे ठेवले होते. शेडमध्ये काही कर्मचारी काम करीत असल्याचे दिसून आले.

Dona Paula IT land
Communidade Land: उरल्यासुरल्या कोमुनिदादच्‍या जमिनी लुटण्‍याचा ‘सनदशीर’ मार्ग! भूखंडांद्वारे विक्री करण्‍याची शक्‍यता

...तर कारवाई होणारच!

आयटी आणि पर्यटन खात्याशी संबंधित बेकायदेशीर जे काही आहे, त्यावर कारवाई होणारच. मुख्यमंत्र्यांनी कणखर निर्णय घेतले असल्याने आपण त्यांचे आभार मानतो. एखादा व्यक्ती बेकायदेशीर बांधकाम करतो, तर इतरजण त्याचे अनुकरण करतात. त्या बेकायदेशीर बांधकामाविषयी संबंधितांना नोटीस काढून आणि अतिक्रमण हटवण्याचा आदेश काढण्यात आला, या सर्व कायदेशीर सोपस्कार पूर्ण करण्यात आले आहेत. पर्यटन आणि आयटीच्या जागेत बेकायदेशीर बांधकामे असतील तर ती हटलीच पाहिजेत, असा पुनरुच्चार आयटी मंत्री रोहन खंवटे यांनी केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com