Goa Taxi Dainik Gomantak
गोवा

Taxi Owners Protest GST Policy : ..हे तर सरकारचे कारस्थान! जीएसटी नोटीसींवरुन टॅक्सीमालक नाराज

Tourist Taxi Owners Goa: पर्यटक टॅक्सीमालकांनी आपल्या मागण्यांसाठी पेडणे येथे आंदोलन केल्यापासून सरकारने त्‍यांचा छळ सुरू केला आहे, असा आरोप होऊ लागला आहे. ज्‍यांच्‍याकडे चारपेक्षा अधिक टॅक्सी आहेत, त्‍यांना जीएसटी नोटीस जारी करण्यात आली आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Multiple Taxi Owners Face GST Scrutiny from Government

पणजी: पर्यटक टॅक्सीमालकांनी आपल्या मागण्यांसाठी पेडणे येथे आंदोलन केल्यापासून सरकारने त्‍यांचा छळ सुरू केला आहे, असा आरोप होऊ लागला आहे. ज्‍यांच्‍याकडे चारपेक्षा अधिक टॅक्सी आहेत, त्‍यांना जीएसटी नोटीस जारी करण्यात आली आहे. गोमंतकीयांचा टॅक्सीव्यवसाय संपविण्याचा सरकारचा प्रयत्‍न आहे, असा आरोप ते करू लागले आहेत.

प्रस्‍तुत प्रतिनिधीने टॅक्सीव्यावसायिक आणि अन्‍य संबंधितांशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, गोवा माईल्स जीएसटी भरत असल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे. आता त्‍यांना गोमंतकीय टॅक्सीचालकांना त्रास द्यायचा आहे. त्यासाठी ‘नोटीस’ हे शस्त्र वापरले जात आहे. व्यवसाय २० लाखांपेक्षा अधिक असेल तरच जीएसटी भरावी लागते. परंतु टॅक्सीचालक एवढे पैसे कमावत नाहीत. त्यामुळे त्यांना जीएसटी भरण्याची गरज नाही.

सरकारने जारी केलेल्या नोटिशींना उत्तर देण्यासाठी टॅक्सीमालकांना ‘सीए’कडे जावे लागते. तिथे २० हजारांपेक्षा जास्त खर्च झाला. टॅक्सीमालकांना त्रास देण्यासाठीच सरकारचे हे कारस्थान आहे, असा आरोप त्‍यांनी केला आहे.

जीएसटीसाठी दबाव

जीएसटी नोंदणी न केल्यामुळे सुमारे अडीचशे पर्यटक टॅक्सीमालकांना व्यापारी कर विभागाने नोटिसा बजावल्या आहेत. चारपेक्षा अधिक टॅक्सी असलेल्यांचा त्‍यात समावेश आहे. नोटिसा बजावण्याची प्रक्रिया तीन महिन्यांपूर्वी सुरू झाली आहे. विशेष म्हणजे १४ टॅक्सी असलेला एकच मालक विभागाकडे समोर आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT