Goa Taxi Dainik Gomantak
गोवा

Goa Taxi: GST चुकवणाऱ्या 260 कॅब ऑपरेटर्सची ओळख पटली; सरकारकडून नोटीसांचा धडाका

GST Tax Goa: राज्यात कर विभागाकडून GST कर न भरलेल्या सुमारे 260 कॅब ऑपरेटर्सची ओळख शोधून काढण्यात आलीये.यापूर्वी देखील विभागाकडून GST टॅक्स भरण्याबद्दलचे नोटिफिकेशन देत कॅब ऑपरेटर्सना GST कर भरण्याचे आदेश देण्यात आले होते.

गोमन्तक डिजिटल टीम

राज्यात कर विभागाकडून GST कर न भरलेल्या सुमारे 260 कॅब ऑपरेटर्सची ओळख शोधून काढण्यात आलीये. कॅब ऑपरेटर्सची ओळख पटण्यासाठी विभागाकडून डेटा इंटेलिजन्सचा वापर करण्यात आला होता. गेल्या तीन महिन्यांपासून राज्यात कर विभागाकडून या कॅब ऑपरेटर्सची माहिती शोधून काढण्यासाठी बँका, प्रादेशिक परिवहन कार्यालये, आयटी विभाग आणि इतर संस्थांकडून माहिती गोळा करण्यात आली होती. यापूर्वी देखील विभागाकडून GST टॅक्स भरण्याबद्दलचे नोटिफिकेशन देत कॅब ऑपरेटर्सना GST कर भरण्याचे आदेश देण्यात आले होते.

माध्यमांना मिळालेला माहितीनुसार राज्यात अनेकजणं 10 ते 12 गाड्यांचे मालक आहेत मात्र तरीही ते सरकारला GST कर भारत नाहीत. प्रत्येक व्यावसायिकांसाठी GST नोंदणी करणे आवश्यक आहे, ज्या व्यावसायिकांची वस्तूंमधून 40 लाख आणि सेवांमधून 20 लाख रुपयांपेक्षा जास्त कमाई होते त्यांना कर भरणे बंधनकारक आहे.

GST अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार एखाद्या व्यक्तीकडे 5-6 पेक्षा जास्त कॅब असल्यास त्याची उलाढाल 20 लाख रुपयांपर्यंत नक्कीच जाते आणि म्हणूनच मार्च 31 ते एप्रिल 1च्या दरम्यान कमाई केलेल्या प्रत्येकाने GST नोंदणी करणे आवश्यक आहे.

टॅक्सी चालकांचे म्हणणे काय?

स्थानिक टॅक्सी चालकांच्या मते जर का व्यवसायाची उलाढाल 20 लाखांपेक्षा जास्त असेल तरच GST भरावा लागतो पण टॅक्सी चालक इतके पैसे कमवत नाहीत, त्यामुळे त्यांना GST भरण्याची गरज नाही.

सरकार मात्र त्यांना कर भरण्यासाठी अनेक नोटीस पाठवतात आहे आणि या नोटिसांना उत्तर म्हणून त्यांना CA ची मदत घ्यावी लागतेय, हे देखील खर्चिक काम असून जवळपास 20 हजार रुपयांचा खर्च उचलावा लागतोय, आणि सरकार केवळ टॅक्सी चालकांना त्रास देण्यासाठी अशा नोटिसा जारी करत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa AAP: दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री आता गोवा आपच्या प्रभारी; नियुक्ती होताच भाजपवर केला हल्लाबोल

Governor of Goa: पी. अशोक गजपती राजू यांचा शपथविधी संपन्न; गोव्याचे नवे राज्यपाल म्हणून सूत्र हाती

Damodar Saptah 2025: जय जय रामकृष्ण हरी! श्री दामोदर भजनी सप्ताहाचे 126 वे वर्ष; रंगणार खास मैफील

Goa Live News: "पी.अशोक गजपती राजू यांचे मी स्वागत करतो" डॉ. प्रमोद सावंत (मुख्यमंत्री)

Google New AI Feature: गुगलचं नवं 'एआय' फीचर लाँच; माहिती शोधणं होणार अधिक अचूक

SCROLL FOR NEXT