Goa Politics : Maharashtrawadi Gomantak Party & BJP Dainik Gomantak
गोवा

गोव्यात मगोपच्या समावेशास भाजपातून वाढता विरोध

10 आमदारांचा गट, ‘सुकाणू’चाही नकारात्मक कौल

दैनिक गोमन्तक

पणजी: महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचा समावेश नव्या भाजपा सरकारात केला जाऊ नये, यासाठीचा सत्ताधारी पक्षातील सूर अधिक बुलंद होऊ लागला आहे. आता या गटात आता किमान दहा सदस्य सहभागी झाल्याची माहिती मिळते. भाजपच्या सुकाणू समितीचाही सुदिन ढवळीकरांना मंत्रिपद देण्यास विरोध आहे.

सुदिन ढवळीकरांना मंत्रिपद देण्यास फोंडा तालुक्यातील भाजप आमदारांनी विरोध केला असला तरी त्या संदर्भात जाहीररीत्या आवाज उठवण्याचे धैर्य फोंड्याचे आमदार रवी नाईक यांनी आज दाखवले. ‘भाजप स्वबळावर सत्तेवर आला आहे, आत्ता आम्हाला मगोपच्या पाठिंब्याची गरज नाही’ असे विधान रवी नाईक यांनी केले. माझ्यासह गोविंद गावडे, सुभाष शिरोडकर, माविन गुदिन्हो, बाबूश मोन्सेरात यांचा मगोपचा पाठिंबा घेण्यास विरोध असल्याचे रवी नाईक म्हणाले.

पणजीच्या एका पंचतारांकित हॉटेलात भाजपाच्या आमदारांची आज बैठक होऊन ढवळीकरांना कोणत्याही परिस्थितीत विरोध करण्याचा निर्णय घेण्यात आला.‘मगोपचा पाठिंबा घेण्याची काही आवश्‍यकता नाही. त्यांनी भाजपचे नुकसानच केले आहे. फोंडा तालुक्यात तर त्या पक्षाचा भाजपच्या वाढीसाठी सतत अडथळा असतो, अशी माहिती यातील एका आमदाराने ‘गोमन्तक’ला दिली.

या प्रतिनिधीने आमदारांशी प्रत्यक्ष चर्चा केली, तेव्हा नाव गुप्त ठेवण्याच्या अटीवर ते म्हणाले, ढवळीकरांना मंत्रिमंडळात घेणेच चूक आहे. उलट सार्वजनिक बांधकाम खाते व्यवसायाने अभियंता असलेल्या गोविंद गावडे यांना मिळाले तर ते या खात्याला अधिक चांगला न्याय देऊ शकतील.

भाजपचे माजी खासदार नरेंद्र सावईकर यांचा ढवळीकरांच्या समावेशासाठी आग्रह असल्याची माहिती मिळते. लोकसभा निवडणुकीसाठी मगोचा पाठिंबा फायदेशीर ठरेल, असा आग्रह सावईकरांनी धरल्याचे या आमदारांचे म्हणणे आहे. परंतु सुकाणू समितीच्या एका ज्येष्ठ सदस्याच्या माहितीनुसार पक्ष संघटनेतील कोणाचाही ढवळीकरांच्या बाजूने कल नाही.

मडकई भाजप मंडळाची मागणी

फोंडा : भाजकडे स्वतःचे वीस आमदार व तीन अपक्ष असताना आणखी मगो पक्षाचा पाठिंबा पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांनी घेऊ नये अशी मागणी मडकई भाजप मंडळाने फोंड्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली. यावेळी भाजपचे सुदेश भिंगी, सागर मुळवी, प्रशांत नाईक, जयराज नाईक, दिनेश वळवईकर व विठ्ठलदास नागवेकर आदी उपस्थित होते.

प्रमोद सावंत यांचीही नाराजी

सुदिन ढवळीकरांची निवडणुकीपूर्वीची वक्तव्ये त्यांच्या विरोधात गेलीत. मुख्यमंत्री सावंतांच्या विरोधात भूमिका घेत ते नेतेपदी असू नये, असे ढवळीकर कठोरपणे बोलत. त्यामुळे प्रमोद सावंत यांचाही ढवळीकरांना फारसा पाठिंबा नाही.

अमित शहांचे मत

‘सावंत यांनी मगोपबद्दल पक्षश्रेष्ठींनी भूमिका घ्यावी, असे मत मांडल्याचे सुकाणू समितीच्या एका ज्येष्ठ सदस्याने सांगितले. अमित शहा यांनी स्‍थिर सरकारासाठी मगोपच्या बाजूने विचार चालविला होता. परंतु विधिमंडळ पक्षाच्या संमतीशिवाय ते कोणताही निर्णय घेणार नाहीत, अशी माहिती मिळते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Assembly Live: गोव्याच्या तिसऱ्या जिल्ह्याचे मुख्यालय अद्याप निश्चित झालेले नाही: मुख्यमंत्री

Goa Crime: रशियन महिलेने केली गांज्याची शेती, जामीनावर बाहेर, रशियातून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे होणार सुनावणीत सहभागी

Mapusa: बार्देश प्रशासकीय संकुलाची दुर्दशा! नाक मुठीत धरून करावी लागते ये-जा; पार्किंगची समस्याही जटील

Weekly Horoscope: आर्थिक बाबतीत सावधगिरी, करिअरमध्ये प्रगती; जाणून घ्या तुमच्या राशीचा आठवडा कसा असेल?

Morjim: वाळूचे तेंब उद्ध्वस्त करून पार्किंग प्रकल्प नकोच! नागरिकांचा इशारा; पंचायत, आमदाराचा प्रकल्पाला पाठिंबा

SCROLL FOR NEXT