Beggars  Dainik Gomantak
गोवा

पणजीत भिकाऱ्यांची वाढती संख्या चिंताजनक

महिलांचे प्रमाण मोठे: किनारी भागांत वावर

दैनिक गोमन्तक

पणजी: पणजी महानगरपालिकेच्‍या नुकत्‍याच झालेल्‍या बैठकीत राजधानीत भिकाऱ्यांची संख्या वाढत असल्‍याचा मुद्दा चर्चेस आला होता. माजी महापौर तथा विद्यमान नगरसेवक उदय मडकईकर यांनी हा विषय मांडला. याबाबत राज्‍यातील इतर शहरांची माहिती घेतली असता केवळ राजधानी पणजीतच नव्‍हे तर राज्‍यातील प्रमुख शहरांत विशेषतः किनारी भागात भिकाऱ्यांचा वावर अधिक असल्‍याचे दिसून आले.

राज्‍याचे प्रवेशद्वार मानल्‍या जाणाऱ्या म्‍हापसा, आर्थिक राजधानी मडगाव, फोंडा, वास्‍को आणि किनारी भागांतील कळंगुट, बागा, हरमल, कोलवा आदी परिसरात भिकाऱ्यांची संख्या अधिक दिसून आली. भिकाऱ्यांमध्ये जास्‍त करून महिला अधिक दिसतात. कडेवर मूल घेऊन सर्वत्र फिरणाऱ्या महिला जास्‍त दिसून आल्‍या. किनारी भागात दिवसभर भीक मागायची, जे मिळेल ते अन्न खायचे आणि रात्री जिथे मिळेल तिथे आसरा घ्यायचा, असा यांचा दिनक्रम असतो.

राजधानीतील सिग्‍नलजवळ आणि वाहतूक बेटावर भिकारी हमखास आढळतात. वाहने थांबली की खिडकीतून हात घालून ते पैसे मागतात, असा अनुभव बहुतेक वाहनचालकांना सध्या येत आहे. याचा त्रास केवळ स्‍थानिकच नव्‍हे तर पर्यटकांनाही होत असल्‍याची माहिती कळंगुट येथील एका शॅकचालकाने दिली. त्‍यांना जेवण दिले किंवा काम दिले तर ते थांबत नाहीत. त्‍यांना केवळ पैसेच हवे असतात.

टोळी कार्यरत असल्‍याचा संशय: डेस्‍मंड ओलिवेरा

गोवा पर्यटनस्‍थळ असल्‍याने देश-विदेशी पर्यटकांची मोठी संख्या येथे मोठी असते. यामुळे राज्‍यात भिकाऱ्यांची संख्या वाढत असल्‍याचे म्‍हापसा येथील सामाजिक

कार्यकर्ते डेस्‍मंड ओलिवेरा यांनी सांगितले. आमच्‍या एनजीओच्‍या वतीने त्‍यांना जेवण, तात्‍पुरता निवारा देण्याचा प्रयत्‍न केले. पण हे लोक अचानक पळून जातात. जेवण दिले तर घेत नाहीत, कामही स्‍वीकारत नाहीत. केवळ रोख रकमेची ते मागणी करतात. यामुळे यामागे एखादी टोळी कार्यरत असावी, असा संशय त्‍यांनी व्‍यक्‍त केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Delhi Airport Technical Glitch: 800 फ्लाईट्सना विलंब, अनेक रद्द; दिल्ली विमानतळावर तांत्रिक अडचणीचा हजारो प्रवाशांना फटका

"तुझी मासिक पाळी संपली की सांग...": महिला क्रिकेटपटूचा सिलेक्टरवर लैंगिक अत्याचाराचा आरोप, क्रीडा विश्वात खळबळ

समुद्रकिनारी रंगला भव्य विवाह! तेजश्री प्रधानने गोव्याच्या किनाऱ्यावर केलं 'Destination Wedding' शूट

Goa Today's News Live: काणकोण बसस्थानकाजवळील रस्त्याची दुर्दशा, चालक हैराण

Abhishek Sharma Record: अभिषेक शर्माने टी-20 मध्ये रचला इतिहास, कर्णधार सूर्यकुमार यादवचा विक्रम मोडला; मॅक्सवेललाही पछाडलं

SCROLL FOR NEXT