Vegetable Market Dainik Gomantak
गोवा

Vegetable Market: गावठी भाजीला वाढती मागणी, टोमॅटोत चढउतार

राज्यातील भाजीपाल्याचे भाव गेले दोन आठवडे स्थिर आहेत.

गोमन्तक डिजिटल टीम

राज्यात रब्बी हंगामातील अनेक प्रकारची पिके बाजारात दाखल झाली असून या पिकांना अधिक प्रमाणात मागणी आहे. शेतकऱ्यांनी पिकवलेली लालभाजी, मुळा, तसेच इतर पालेभाज्या, भेंडी व इतर फळभाज्या खरेदीकडे ग्राहकांचा अधिक कल आहेत.

राज्यातील भाजीपाल्याचे भाव गेले दोन आठवडे स्थिर आहेत. कांदे, बटाट्याचे भाव गेल्या महिन्याभरापासून स्थिर असून केवळ टोमॅटोच्या भावात चढ-उतार दिसून येत आहे. राज्यात भाजीपाल्यासह गावठी भाज्यांनाही चांगली मागणी आहे. राज्यात विविध प्रकारचे आंबे दाखल होत असून तोतापूरी आंबे पणजी बाजारात दाखल झाले आहे.

मटार दरात घट -

राज्यात दोन आठवड्यांपूर्वी मटार 80 रूपये प्रति किलो दराने विकले जात होते. मात्र, आता मटारच्या दरात घट झाली असून 60 रूपये प्रति किलो दराने विकले जात आहेत. 40 रूपये किलो दराने मिळणाऱ्या कांद्यांच्या दरात देखील घट झाली आहे. एकदंरीत राज्यात आठवडाभरापासून भाजीचे दर समाधानकारक आहेत.

दर प्रतिकिलो (रुपयांत)

कांदा....................................................30

बटाटा...................................................30

टोमॅटो...................................................25

गवार....................................................60

कोबी....................................................30

फ्लॉवर.................................................40

गाजर....................................................60

भेंडी...............................................60-70

मटार............................................60-80

शिमला मिरची.....................................80

पालेभाजी प्रतिजुडी (रुपयांत)

मेथी......................................................20

लालभाजी............................................10

कांदापात.............................................10

मुळा.................................................... 10

पालक................................................. 10

शेपू.......................................................10

पुदिना...................................................10

कोथिंबीर............................................ 20

लिंबू - .................................5 रुपयांना 1

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Japan Earthquake: जपानमध्ये 7.5 रिश्टर स्केलचा शक्तिशाली भूकंप; उत्तर-पूर्वी किनारपट्टीवर त्सुनामीचा हाय-अलर्ट VIDEO

IPL 2026 Points Table: पंजाबचा 'पंजा' भारी! डबल हेडरनंतर गुणतालिकेत 'टॉपर'; मुंबई-चेन्नई अन् कोलकाताच्या गोटात चिंतेचं सावट

Israel Lebanon Map: युद्धविरामानंतर इस्रायलचा मोठा 'गेम'! नकाशाद्वारे लेबनॉनच्या भूभागावर वर्चस्व सिद्ध; हिजबुल्लासाठी धोक्याची घंटा

Vaibhav Suryavanshi Crying: टोपीने तोंड लपवले, डोळे पुसले पण हुंदका थांबेना! राजस्थानचा 'वंडर बॉय' ढसाढसा रडला; '16 सेकंदांचा' व्हिडिओ व्हायरल

Middle East War: "युद्ध तुम्ही लादलं, खर्चही तुम्हीच द्या''! युएईची अमेरिकेला थेट तंबी; डॉलर सोडून चिनी 'युआन'कडे वळण्याचा दिला इशारा

SCROLL FOR NEXT