Goa Police Dainik Gomantak
गोवा

Goa Police : गोवा पोलिसांचा ग्रुप इंश्युरन्स झाला स्थगित

विमा कंपनीने हफ्ता वाढवल्यामुळे गोवा पोलिसांच्या विमा कवचाचं नुतनीकरण करण्यात आलेलं नाही.

आदित्य जोशी

Goa Police : गोवा पोलिसांच्या चिंतेत भर टाकणारी बातमी समोर आली आहे. पोलिसांना दिला जाणारा ग्रुप इन्शुरन्स स्थगित करण्यात आला आहे. इतकंच नाही तर याबाबतचं धक्कादायक कारणही आता समोर आलं आहे. विमा कंपनीने हफ्ता वाढवल्यामुळे गोवा पोलिसांच्या विमा कवचाचं नुतनीकरण करण्यात आलेलं नाही.

गोवा पोलिस वेल्फेअर सोसायटीच्या निरीक्षकांनी एक पत्र जारी केलं आहे, ज्यामध्ये ग्रुप इन्शुरन्स स्थगित केल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. 2021-22 या वर्षासाठीचा मेडिक्लेम 28 जून 2022 रोजी संपला होता. मात्र त्यानंतर विमा कंपनीने हफ्त्याची रक्कम वाढवल्याचं कारण देत नुतनीकरणाकडे पोलीस प्रशासनाने पाठ फिरवल्याचं चित्र आहे. यामुळे जीवाची जोखीम पत्करुन कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांच्या आर्थिक सुरक्षिततेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे.

मेडिक्लेम नुतनीकरण न केल्यामुळे सध्या पोलीस दलामध्ये नाराजीचं वातावरण आहे. नुतनीकरण रखडल्याचं पत्र सध्या सोशल मीडियावर चांगलंच व्हायरल होत आहे. यावरुन आता वातावरण तापण्याची शक्यता आहे. गोव्यात गृहखातं मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याकडेच असल्यामुळे मुख्यमंत्री या प्रकरणी काय निर्णय घेतात हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT