Goa News|Transport trucks | Dainik Gomantak
गोवा

Goa News: ग्रीन टॅक्स, अन्य करांमुळे ट्रकमालक वैतारले

ग्रीन टॅक्स, जीपीएसचे पैसे भरणे आणि अन्य करांच्या भारामुळे ट्रकमालक मेटाकुटीला आले आहेत.

दैनिक गोमन्तक

Goa News: गेल्या बारा वर्षांपासून खनिज खाणी बंद असल्याने या व्यवसायावर अवलंबून असलेल्या लोकांचे हाल झाले आहेत. त्यात भर म्हणून आता ग्रीन टॅक्स, जीपीएसचे पैसे भरणे आणि अन्य करांच्या भारामुळे ट्रकमालक मेटाकुटीला आले आहेत. तो भार त्वरित कमी करावा, अशी मागणी दक्षिण प्रोग्रेसिव्ह ट्रकमालक संघटनेने पत्रकार परिषदेतून केली आहे.

सावर्डे येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेला संघटनेचे अध्यक्ष प्रकाश राऊत देसाई, कॅजिटन फर्नांडिस, सत्यवान गावकर व लक्ष्मण देसाई उपस्थित होते.

रस्ता वाहतूक खात्याकडून ट्रक फिटनेस सर्टिफिकेट घेण्यासाठी पंधरा वर्षांवरील ट्रकसाठी ग्रीन टॅक्स बराच वाढविला आहे. फिटनेस सर्टिफिकेटची मुदत संपली त्या दिवसापासून प्रतिदिवस पन्नास रुपये दंड आकारण्यात येत आहे तो त्वरित मागे घ्यावा, अशी मागणी यावेळी प्रकाश देसाई यांनी केली.

तोपर्यंत ट्रक पाठवू नये

पूर्वी जीपीएसचे पैसे खनिज वाहतूक सुरू असताना भरले जात होते व आता वाहतूक बंद असूनही वर्षाचे बाराही महिने पैसे विनाकारण भरावे लागत आहेत. तसेच ट्रकमालकांची वाहतूक दराविषयीची मागणी जोपर्यंत सरकार मान्य करीत नाही, तोपर्यंत एकाही ट्रकमालकाने खनिज वाहतुकीसाठी आपला ट्रक पाठवू नये, असे आवाहन फर्नांडिस यांनी केले.

ग्रीन टॅक्स व मुदत संपल्यानंतर दिवसाकाठी पन्नास रुपये दंडाविषयी खाण खात्याकडे लेखी निवेदन दिले आहे. खात्यातर्फे खास खनिज वाहतूक करणाऱ्या ट्रकसाठी एक योजना सुरू करणार असून त्याद्वारे ग्रीन टॅक्सचे व दिवसाकाठी पन्नास रुपये आकारले जातात ते त्यांना परत मिळणार असल्याचे खाण खात्यातर्फे सांगण्यात आले आहे. - कॅजिटन फर्नांडिस

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope: आठवडा विशेष: चंद्र राशीनुसार 'प्रेमसंबंध, आरोग्य आणि आर्थिक' स्थिती कशी राहील? सर्व 12 राशींचं भविष्य वाचा

Omkar Elephant: ओंकार हत्ती 'शांत'च! उपवनसंरक्षकांकडून 'अग्रेसिव्ह' चर्चांना पूर्णविराम, रेस्क्यूसाठी चार ठिकाणं निवडली

Gold Price: बाजारात महागाईचा तडाखा! सोन्याच्या दराने मोडले सर्व रेकॉर्ड; पहिल्यांदाच 10 ग्रॅम सोन्याचा भाव 1 लाख 30 हजाराच्या पार

'खराब रस्त्यांच्या दुरुस्तीची सुरू, 15 दिवसांत काणे पूर्ण होणार'; आपच्या निवेदनानंतर CM सावंतांची माहिती

CM प्रमोद सावंतांविरोधात बदनामीकारक व्हिडिओ करणाऱ्या गौरव बक्शीला 50,000 दंड; कोर्टासमोर मागितली माफी

SCROLL FOR NEXT