G20 Summit In Goa Dainik Gomantak
गोवा

G20 Summit In Goa: ग्रीन कॉरिडॉर, कडक सुरक्षा, 24 तास हॉटलाइन! गोव्यात कशी सुरू आहे G20 साठी तयारी?

शिखर परिषदेच्या मे महिन्यात दोन, जूनमध्ये चार आणि जुलैमध्ये एक बैठक होणार आहे. प्रत्येक बैठकीला 25 ते 26 देशांतील सुमारे 300 ते 400 प्रतिनिधी उपस्थित राहण्याची शक्यता आहे

Pramod Yadav

G20 In Goa: गोव्यात 17 ते 19 एप्रिल 2023 या कालावधीत G20 च्या बैठका होणार आहेत. G20 शिखर परिषदेच्या पहिल्या बैठकीला केवळ दहा दिवसांचा कालावधी शिल्लक आहे.

बाम्बोळी येथील ग्रँड हयातमध्ये 17 ते 19 एप्रिल दरम्यान G20 शिखर परिषदेची पहिली बैठक होणार आहे. तर, उर्वरित सात बैठका ताजमध्ये होणार आहेत.

"शिखर परिषदेच्या मे महिन्यात दोन, जूनमध्ये चार आणि जुलैमध्ये एक बैठक होणार आहे. प्रत्येक बैठकीला 25 ते 26 देशांतील सुमारे 300 ते 400 प्रतिनिधी उपस्थित राहण्याची शक्यता आहे."

राज्यात होणाऱ्या G20 शिखर बैठकीच्या पार्श्वभूमीवर विविध देशांच्या येणाऱ्या प्रतिनिधींसाठी सुविधा आणि त्यांच्या कडेकोट सुरक्षेवर भर दिला जात आहे.

प्रतिनिधींच्या वाहतुकीसाठी सज्ज असलेल्या ग्रीन कॉरिडॉरपासून ते त्यांना वैद्यकीय कव्हर, 24 तास हॉटलाइनसह 30 खाटांच्या विशेष रूग्णालयाची व्यवस्था करण्यात आली आहे. या काळात अचानक कोरोना प्रादुर्भाव वाढल्यास या आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी ते सज्ज करण्यात आले आहे.

G20 साठी आरोग्य आपत्कालीन परिस्थिती हातळण्यासाठी राज्य सरकारच्या वतीने गोवा वैद्यकीय महाविद्यालय अधिकृत रुग्णालय म्हणून नियुक्त केले आहे. रूग्णालयातील 30 खाटांचा सुपर स्पेशालिटी ब्लॉक G20 च्या प्रतिनिधींसाठी सज्ज ठेवण्यात आला आहे.

अतिदक्षता विभाग देखील प्रतिनिधींसाठी सज्ज केला आहे. दाबोळी आणि मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळांवर वैद्यकीय चाचणी करण्यासाठी सोय करण्यात आली आहे. चाचणी बंधनकारण नसली तरी ज्यांना ईच्छा आहे ते चाचणी करू शकतात या त्याची उभारणी करण्यात आलीय.

औषधांसाठी सल्लागार आणि परिचारिका बैठकांच्या ठिकाणी तैनात केल्या जाणार आहेत.

दरम्यान, गोव्यातील आरोग्य उपक्रम बैठकांसाठी येणाऱ्या प्रतिनिधींना दाखवले जाणार आहेत. यात खोर्ली येथील प्राथमिक आरोग्य केंद्र दाखवले जाईल.

या ठिकाणी "आरोग्य व्यवस्थापन प्रणाली अंतर्गत, प्रतिनिधींना खोर्ली येथील प्राथमिक आरोग्य केंद्र (PHC Corlim) दाखविण्यात येणार आहे. खोर्ली येथे ऑनलाइन रूग्ण नोंदणी, उपचार पद्धती, स्कॅन ओपीडी यांचा परिचय करून दिला जाणार आहे. याशिवाय आयुष्यमान भारत या योजनेची देखील माहिती दिली जाणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT