Goa Beach: मद्य सेवन, सूचनांकडे दुर्लक्ष; वर्षात कळंगुट आणि बागा समुद्रकिनाऱ्यावर सर्वाधिक बचावकार्य

मद्य सेवन आणि जीवरक्षकांच्या सूचनांकडे दुर्लक्ष करून सीमांकित सुरक्षित क्षेत्राच्या पलीकडे समुद्रात गेल्यामुळे अपघात झाल्याचे दिसून आहे.
Goa Beach Rescue
Goa Beach RescueDainik Gomantak

Goa Beach Rescue: गोव्यात येणाऱ्या पर्यटकांसोबत समुद्रकिनाऱ्यावर काही अपघात घडत असतात. अतिउत्साही पर्यटका बऱ्याचवेळा पोहण्यासाठी खोल समुद्रात जातात किंवा जलक्रीडा करताना काही अपघात होतात. अशा पर्यटकांचा जीव वाचविण्यासाठी राज्य सरकारच्या वतीने समुद्रकिनाऱ्यावर जीवरक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे.

दृष्टी जीवरक्षकांनी गोव्यात मागील एक वर्षात केलेल्या बचाव कार्याची माहिती प्रसिद्ध केली आहे. या माहितीच्या आधारे कळंगुट आणि बागा समुद्रकिनाऱ्यावर सर्वाधिक बचावकार्य करण्यात आले आहे.

दृष्टी मरीन एजन्सीने ( Drishti Marine Agency) जानेवारी 2022 ते फेब्रुवारी 2023 दरम्यान गोव्याच्या किनार्‍यावर केलेल्या बचाव कार्याचा डेटा प्रसिद्ध केला आहे. या आकडेवारीनुसार, कळंगुट समुद्रकिनाऱ्यावर 167 बचाव कार्ये करण्यात आले. त्यानंतर बागा समुद्रकिनाऱ्यावर 113 बचावकार्य करण्यात आली. याशिवाय उत्तर गोव्यातील हरमल (43), मोरजी (29) आणि वागातोर (24) बचावकार्याच्या घटना घडल्या आहेत.

याच कालावधीत दक्षिण गोव्यात पाळोळे समुद्रकिनाऱ्यावर 25 बचावकार्याच्या घटना घडल्या असून, त्यापाठोपाठ कोलवा येथे 18, बानावलीत 06, आगोंद आणि केळशी येथे प्रत्येकी पाच बचावकार्याच्या घटना नोंदवल्या.

Goa Beach Rescue
Goa Police: पर्यटकांवरील हल्लाप्रकरणी 'त्या' दोन रिसॉर्टचा परवाना रद्द होणार? पोलिसांचे पर्यटन विभागाला पत्र

मद्य सेवन आणि जीवरक्षकांच्या सूचनांकडे दुर्लक्ष करून सीमांकित सुरक्षित क्षेत्राच्या पलीकडे समुद्रात गेल्यामुळे अपघात झाल्याचे दिसून आहे. खडकाळ भागाजवळ घेतलेले सेल्फी हे देखील अशा अपघातांचे प्रमुख कारण आहे, असे दृष्टी एजन्सीने म्हटले आहे.

गोवा आणि कर्नाटकच्या सीमेवर असलेल्या दूधसागर धबधब्याला दरवर्षी लाखो पर्यटक भेट देत असतात. दरम्यान, या ठिकाणी देखील काही अपघात घडत असतात. पर्यटकांची मोठी गर्दी असलेल्या दूधसागर धबधबा येथे दृष्टी एजन्सीने वर्षभरात 55 बचावकार्ये केली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com