great enthusiasm of Coco god in goa  Dainik Gomantak
गोवा

नार्वेत ‘कोको’ देवाची जत्रा प्रचंड उत्साहात

12 वर्षांनी उत्सव: विजयगुढीच्या दर्शनास भक्तांचा महापूर ; मुख्यमंत्रीही उपस्थित

दैनिक गोमन्तक

डिचोली: शिवकालीन इतिहास असलेल्या नार्वे गावातील श्री थोरल्या देवाची अर्थातच 'कोको' देवाची जत्रा गुढीपाडव्याच्या पूर्वदिनी म्हणजेच शुक्रवारी (ता. 1 एप्रिल) परंपरेप्रमाणे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. बारा वर्षांच्या कालखंडानंतर देवाच्या विजयगुढीची मिरवणूक काढण्यात आल्याने तिचे दर्शन घेण्यासाठी नार्वे गावात भक्तांचा महापूर लोटला होता.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यासह डिचोली आणि मयेचे आमदार प्रेमेंद्र शेट यांनीही या जत्रेला उपस्थिती लावली होती.

या जत्रेचे वैशिष्ट्य म्हणजे गेली बारा वर्षे अज्ञातवासात असलेल्या श्रीरामाच्या विजयगुढीने गावातील श्री सप्तकोटेश्वरासह अन्य देवांना मिरवणुकीने भेट दिली. यापूर्वी पंधरा वर्षांच्या कालखंडानंतर 15 मार्च 2010 रोजी ही जत्रा साजरी करण्यात आली होती. बारा वर्षांनी ‘कोको’ देवाची जत्रा साजरी होणार असल्याने संपूर्ण नार्वे गाव मंगल आणि भक्तिमय वातावरणात न्हावून निघाला होता.

हिंदळे या वाड्यावरील श्री चावडेश्वर मंदिरातून फुलांचा कळस श्रीदेवी कणकेश्वरी देवीच्या मंदिरात येतो. त्यानंतर गावकरवाडा येथील श्री शांतादुर्गा (पिळर्णकरीण), कोनाडी वाड्यावरील श्रीदेव खाप्रो रवळनाथ मंदिर, मुर्डीवाड्यावरील श्रीराम मंदिर आणि श्री सप्तकोटेश्वर मंदिर अशा क्रमाने पाचही वाड्यावरील फुले कणकेश्वरीच्या मंदिरात आल्यानंतर त्या फुलांनी थोरल्या देवाला साजविण्यात येते.

रतन अबोलीच्या झेल्यांनी देवाला पूर्णपणे सजविण्यात येते. देवाला रतन अबोलीची फुले प्रिय आहेत, अशी भावना आहे. देवाला सजविल्यानंतर बारा हात लांबीच्या बांबूला श्रींची विजयगुढी जोडली जाते. पूजन झाल्यानंतर विजयगुढी घेणाऱ्या बारा वांगड्यांवर अवसर येतो. ते सर्वजण बांबूला खांद्यावर घेतात. त्यावेळी बंद असलेले कणकेश्वरी मंदिराचे दार उघडले जाते. मंदिराचे दार उघडताच देवाची स्वारी पारंपरिक वाटेतून धावत सुटते, ती सरळ श्री सप्तकोटीश्वर मंदिरात जाते. देवाबरोबर भाविक लोकही धावतात. श्री सप्तकोटीश्वर मंदिरात पोहोचल्यावर देव गर्भगृहात जाऊन श्री सप्तकोटीश्वराची भेट घेतो. तेथून देव तीर्थावर जातो. तेथे देवावर तीर्थ देवांवर शिंपडले जाते. तेथून देव मिरवणुकीने चावडेश्वर मंदिरात भेट देऊन पूर्ववत कणकेश्वरी मंदिरात आल्यानंतर उत्सवाची सांगता होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: चिकन-मटन विसरा, इथे मिळतात चक्क 'कोब्रा सापाचे भजी अन् समोसे', खवय्यांची होते मोठी गर्दी; व्हिडिओ पाहून चक्रावले नेटकरी

Death Penalty News: लाखो निष्पापांच्या रक्ताने माखलेले हात, 24 वर्षांच्या जुलमी राजवटीचा भयानक अंत; 'या' देशाच्या माजी राष्ट्राध्याक्षासह भावाला फाशीची शिक्षा

Abhishek Porel Arrested: लव्ह, सेक्स अन् ब्लॅकमेलिंग! 23 वर्षीय स्टार आयपीएल खेळाडूला बलात्कार प्रकरणात अटक; उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर मोठी कारवाई

Benjamin Netanyahu: "मी पंतप्रधान असेपर्यंत पॅलेस्टिनी राष्ट्र होणार नाही!", नेतन्याहूंचा डोनाल्ड ट्रम्पला मोठा झटका; धुडकावली 15 कलमी योजना

Chaturgrahi Yog 2026: नोकरीत प्रमोशन अन् नव्या जबाबदाऱ्या! चतुर्ग्रही योग 'या' 4 राशींसाठी ठरणार वरदान; व्यवसायात होणार कोट्यवधींचा नफा

SCROLL FOR NEXT