Grand Master Anurag Mahamal Dainik Gomantak
गोवा

Chess Olympiad: ग्रँडमास्टर अनुराग म्हामल अंगोला देशाच्या प्रशिक्षकपदी

बुद्धिबळ ऑलिंपियाड: आफ्रिकन संघाच्या न खेळणाऱ्या कर्णधारपदाचीही जबाबदारी

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: गोव्याचा बुद्धिबळातील पहिला ग्रँडमास्टर अनुराग म्हामल (Grand Master Anurag Mahamal) आगामी बुद्धिबळ ऑलिंपियाडमध्ये (Chess Olympiad) प्रशिक्षकपदाच्या जबाबदारीत दिसेल. मध्य आफ्रिकेतील अंगोला देशाचा (Angola Country) प्रशिक्षक आणि न खेळणारा कर्णधार अशी दुहेरीत जबाबदारी 27 वर्षीय गोमंतकीय खेळाडूकडे सोपविण्यात आली आहे.

अनुरागच्या नियुक्तीची माहिती गोवा बुद्धिबळ (Goa Chess) अस्थायी समितीचे निमंत्रक सचिन आरोलकर यांनी दिली. भारतात बुद्धिबळ ऑलिंपियाड (Chess Olympiad) स्पर्धा प्रथमच होत आहे. चेन्नई (Chennai) येथे 28 जुलै ते 09 ऑगस्ट या कालावधीत होणाऱ्या स्पर्धेत खुल्या गटात 186, तर महिला गटात 160 देशांचा सहभाग आहे. या स्पर्धेत विविध देशांतील मिळून 250 ग्रँडमास्टर खेळतील. त्यात खुल्या गटात 235, तर महिला गटात 15 ग्रँडमास्टर असतील. एकंदरीत 994 किताब धारक या स्पर्धेत खेळणार आहेत.

बुद्धिबळ ऑलिंपियाडनिमित्त देशभरात ज्योत दौड (Chess Olympiad Torch) घेण्यात आली. अनुरागला ज्योत धारक हा मान गोव्यात, तसेच मध्य प्रदेशमधील उज्जैन, भोपाळ व इंदूर या शहरात मिळाला होता. अंगोला संघाच्या प्रशिक्षक-न खेळणारा कर्णधारपदी निवड झाल्याबद्दल गोवा बुद्धिबळ अस्थायी समितीने अनुरागचे अभिनंदन केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sanjivani Sugar Factory: साखरेच्या गोडीमागची कडू कहाणी; 7 वर्षांपासून बंद ‘संजीवनी’ला मिळणार का नवजीवन?

Crime News: लिव्ह-इन पार्टनरचा गळा चिरला, मृतदेह 18 तास घरात ठेवला अन् नंतर घाटात फेकून दिला, गर्लफ्रेंडसह दोघांना बेड्या; 15 वर्षांच्या नात्याचा थरारक शेवट!

Viral Video: स्वातंत्र्यदिन पाकिस्तानचा, पण गाणं भारतीय! कार्यक्रमातील व्हिडिओ व्हायरल, नेटकरी म्हणाले, "अखंड भारताचं स्वप्न...'

Madhya Pradesh Accident: मध्य प्रदेशातील भिंडमध्ये भीषण अपघात! डंपर आणि पिकअपच्या धडकेत 8 मजुरांचा मृत्यू, 25 जण गंभीर जखमी

Money Laundering Case: रोहन हरमलकरसह चौघांवर 'मनी लाँड्रिंग'चे आरोप निश्चित; 25 ऑगस्टला पुढील सुनावणी

SCROLL FOR NEXT