Goan Culture Lokotsav 2023 Dainik Gomantak
गोवा

Goan Culture Lokotsav 2023: 'लोकोत्सव 2023’चे गोव्यात दिमाखात उद्‌घाटन

लोकोत्सवात विविध राज्यांतून आलेल्या कलाकारांनी आपली कला सादर केली.

दैनिक गोमन्तक

Goan Culture: मानव यांत्रिकीकरणात गुरफटला आहे. सर्वत्र पाश्‍चिमात्य मूल्य प्रभावी होत आहेत. अशा समयी अंतरंगातून अलौकिक करणारी भारतीय संस्कृती आणि विविधतेत एकता दर्शविणाऱ्या अशा प्रकारच्या लोकोत्सवांचे आयोजन ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन राजस्थानचे राज्यपाल कलराज मिश्र यांनी केले.

पश्‍चिम क्षेत्र सांस्कृतिक केंद्र, उदयपूर व कला व संस्कृती संचालनालयाद्वारे दर्यासंगम कला अकादमी येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘लोकोत्सव 2023’च्या उद्‌घाटनसमयी मिश्र बोलत होते. यावेळी व्यासपीठावर मुख्यमंत्री प्रमोद सावंत, कला व संस्कृती मंत्री गोविंद गावडे, सचिव मिनिनो डिसोझा, संचालक सगुण वेळीप व किरण सोनी गुप्ता उपस्थित होते.

भारतीयत्वाचा आधारस्तंभ

कला जीवनाला समृद्ध करत असते. मन प्रफुल्लित करत असते. लोकोत्सव हा लोकमनाची जीवंतता आहे. तन-मनाने ज्यावेळी आपण कलाकार होतो, त्यावेळीच अशाप्रकारचे लोकोत्सव होऊ शकतात. सभ्यता, भाषा, पेहराव यामध्ये जरी भिन्नता असली तरी विविधतेतून एकता दिसून येत आहे. हा लोकोत्सव भारतीयत्वाचा आधारस्तंभ असल्याचे राज्यपाल मिश्र यांनी सागंतिले.

कलेला हातभार लागेल

कलाकारांना, हस्तकारागिरांना प्रोत्साहन देण्यासाठी, त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप मारण्यासाठी या महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. आपण मॉलमधून खरेदी करताना दर पाहत नाही. या महोत्सवातील कलाकारांची उत्पादने सर्वांनी खरेदी करावीत. जेणेकरून त्यांच्या कलेला हातभार लागेल.

रसिक मंत्रमुग्ध

लोकोत्सवात विविध राज्यांतून आलेल्या कलाकारांनी आपली कला सादर केली. यात सर्व उपस्थित प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले. पूर्वरंग कार्यक्रमाने सर्वांची मने जिंकली.

त्यासोबतच, गोमंतकीय समईनृत्य, राजस्थानचे भवाई नृत्य, ओडिसाचा गोटिपुआ, उत्तर प्रदेशचे मयूर भंज, पश्‍चिम बंगालचे परुलिया छाऊ, गुजरातचे मेवासी आदी लोकनृत्य व संगीताच्या कार्यक्रमांद्वारे रसिक प्रफुल्लित झाले. सर्वत्र उत्साहाचे वातावरण होते.

ऑक्टेव महोत्सव यंदा गोव्यात

उत्तर पूर्वेकडील सहा राज्यांचा एकत्र होणारा ‘ऑक्टेव महोत्सव’ यंदा गोव्यात करणार असल्याची घोषणा राज्यपाल मिश्र यांनी केली. तसेच आत्मनिर्भर भारत करण्यासाठी स्थानिक कलाकारांची उत्पादने विकत घेणे गरजेचे असल्याचे तसेच त्यांना जागतिक व्यासपीठ मिळवून देण्यासाठी सहकार्य करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.

लोकोत्सवाच्या माध्यमातून आपली हस्तकला लोकसंस्कृती, खाद्यसंस्कृतीला व्यासपीठ मिळत आहे. देशभरात कला आणि हस्तकला एकत्र आल्याने कोविड महामारीनंतर लोकोत्सवाच्या माध्यमातून लोकसंगम आणि कलासंगम दिसून येत आहे.

लोकत्सवाची उच्चता कलाकारांमुळे वाढते. अनेक पर्यटक या महोत्सवाला भेट देतात. स्वयंपूर्ण गोवा 2.0 च्या माध्यमातून ग्रामीण कलाकारांच्या उत्पादनांना प्रोत्साहन देणे गरजेचे आहे. - डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT