Kavale Gramsabha Dainik Gomantak
गोवा

Kavale Panchayat: नाल्‍यात कचरा फेकणाऱ्यास पाच हजार रुपये दंड; ग्रामसभेत सूचना

Ponda Kavale Gramsabha: पाऊणवाडा-कवळे येथे नवीन साकवाजवळ संरक्षक भिंत उभारण्याचा ठराव यावेळी घेण्यात आला

गोमन्तक डिजिटल टीम

फोंडा: कवळे पंचायतीच्या आज रविवारी झालेल्या ग्रामसभेत विकासकामांबरोबरच विविध समस्यांवरही चर्चा करण्यात आली. नाल्यात कचरा फेकणाऱ्यांना पाच हजार रुपये दंड आकारण्याची सूचना ग्रामसभेत करण्यात आली.

या ग्रामसभेला सरपंच मनुजा नाईक, उपसरपंच सुशांत कपिलेश्‍वरकर, अन्‍य पंचसदस्य, पंचायत सचिव मयूर गावकर व गटविकास कार्यालयाचे अधिकारी उपस्थित होते.

पाऊणवाडा-कवळे येथे नवीन साकवाजवळ संरक्षक भिंत उभारण्याचा ठराव यावेळी घेण्यात आला. पावसाळ्यात झाडे घरांवर पडून मोठी नुकसानी होत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. एखादे झाड घरावर पडल्यास त्याला पंचायतीतर्फे दोन हजार रुपये देण्यात येतात. त्यात वाढ करून ही रक्कम दहा हजार रुपये करण्याबाबत चर्चा झाली.

कवळे भागात रस्ते उखडून गेले आहेत. या रस्‍त्‍यांची दुरुस्‍ती करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली. खराब रस्त्यांचा फटका वाहनचालकांना विशेषतः दुचाकीस्वारांना बसतो. पावसाळ्‍यांतर या रस्‍त्‍यांच्‍या दुरुस्‍तीचे काम प्राधान्याने हाती घ्यावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली.

स्वागत सरपंच मनुजा नाईक यांनी केले. मागील ग्रामसभेचा अहवाल पंचायत सचिव मयुर गावकर यांनी ग्रामस्थांसमोर ठेवला तर उपसरपंच सुशांत कपिलेश्‍वरकर यांनी आभार मानले.

धोकादायक झाडे कापण्‍याची मागणी

कवळे पंचायत क्षेत्रातील कचरा समस्येवर चर्चा करण्यात आली. दोन खांब ते कपिलेश्‍वरीपर्यंतच्या रस्त्यावर धोकादायक झाडे असून ती कधीही कोसळू शकतात. त्यामुळे स्थानिक तसेच प्रवाशांना आणि विशेष म्हणजे या मार्गावरून ये-जा करणाऱ्या विद्यार्थ्यांच्‍या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. ही धोकादायक झाडे कापण्याची मागणी करण्यात आली. यावर कामावर सुमारे दोन लाख रुपये खर्च येणार असून पुढील निर्णय घेऊन कार्यवाही करू, असे पंचायत मंडळाने सांगितले.

ढवळीत डेंग्यू, मलेरियाची भीती

ढवळी येथील स्थानिक महिला विन्सी क्लेमेंत हिने डेंग्यू, मलेरियाची भीती व्यक्त करताना परिसरात आरोग्य खात्यातर्फे औषध फवारणी करण्याची मागणी केली. कवळे पंचायतीसमोरील मैदानाची दुरुस्ती करण्याची मागणीही ग्रामस्थांनी केली. दिवंगत माजी पंचसदस्य पांडुरंग माधव नाईक यांना ग्रामसभेत श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistan Cricket Team: पाकिस्तान संघात पुन्हा एकदा मोठा फेरबदल! सलमान आगाची कॅप्टन्सी जाणार; 'या' खेळाडूकडे सोपवली जाणार संघाची कमान

Shani Gochar 2026: मोठ्या व्यावसायिक डील अन् पदोन्नतीचा योग! 9 ऑक्टोबरपासून उजळणार 5 राशींचं नशीब; शनीचं नक्षत्र परिवर्तन ठरणार वरदान

Viral Post: सकाळी ऑफिसमध्ये वेलकम, तर दुपारी थेट नोकरीवरून काढलं; जॉइनिंगच्या अवघ्या 4 तासांत महिलेसोबत नेमकं काय घडलं? पोस्ट व्हायरल

सनरूफ, 360-डिग्री कॅमेरा, 10.25 इंच स्क्रीन... Maruti Dzireला टक्कर देण्यासाठी येतेय Tataची नवी Aeris; शुक्रवारी होणार लॉन्च

Asian Games 2026: Chak De India! वादळी खेळाच्या जोरावर भारतानं दक्षिण कोरियाला 8-2 ने लोळवलं; सेमीफायनलचं तिकीट जवळपास पक्कं

SCROLL FOR NEXT