Arambol Dainik Gomantak
गोवा

Arambol: हरमल ग्रामसभेत गदारोळ, आवाज चढविणाऱ्या सचिवांना ग्रामस्थांनी घेरलं! ना हरकत दाखला नसल्यामुळं कामं रखडल्याचा दावा

Gram Sabha Meeting Clash: येथील ग्रामसभेत बोलताना पंचायत सचिवाने आवाज चढविण्याचा प्रयत्न केल्याने ग्रामस्थांनी आक्षेप घेत सचिवाला घेरण्याचा प्रयत्न केला.

दैनिक गोमन्तक डिजिटल

हरमल: येथील ग्रामसभेत बोलताना पंचायत सचिवाने आवाज चढविण्याचा प्रयत्न केल्याने ग्रामस्थांनी आक्षेप घेत सचिवाला घेरण्याचा प्रयत्न केला. सचिवाला आवाज चढविण्याचा अधिकार आहे का, असा प्रश्न उपस्थित करून ग्रामस्थांच्या प्रश्नांना योग्य प्रकारे उत्तरे देण्याचा सल्ला यावेळी ग्रामस्थांनी दिला.

न्यायालयाच्या निर्देशानुसार पंचायत क्षेत्रात व्यापार परवाना दिलेल्या आस्थापनांची यादी सादर करण्याचे आदेश पंचायतींना देण्यात आले होते. त्यानुसार या भागातील अंदाजे ३०० आस्थापनांची यादी सादर केल्याचे सचिवांनी सांगितले. मात्र, परवानाधारक व्यावसायिकांची नावे त्या यादीत समाविष्ट केल्याने ए. डी. डिसोझा यांनी नाराजी व्यक्त केली.

त्यावेळी सचिव नार्वेकर यांनी कागदपत्रे बोगस असल्याचे सांगून आवाज चढविण्याचा प्रयत्न केला.या प्रकाराला माजी सरपंच अनंत गडेकर, संजय नाईक, मार्सेलीन फर्नांडिस आदींनी आक्षेप घेत सचिवाला घेरण्याचा प्रयत्न केला.ही सभा सरपंच दिव्या देऊ गडेकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली.

पंचायत सदस्यांनी आतापर्यंत किती विकासकामे पूर्ण झाली आणि किती प्रस्ताव प्रलंबित आहेत, असा प्रश्न टोनी डिमेलो यांनी लिखित स्वरूपात उपस्थित केला होता. काही सदस्यांनी ना हरकत दाखला न मिळाल्याने प्रस्ताव रखडल्याचे सांगितले. मात्र पंचायत निधीतून एकही काम मार्गी लागले नसल्याने ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Law And Order: आकड्यांचा सलाम!

Goans Surrender Passports: रोज सरासरी 5 गोमंतकीय पासपोर्ट करतात सरेंडर; 3.5 वर्षांत तब्बल 6,960 जणांनी पासपोर्ट सोडला

Diamond Robbery: 380000000 चा 200 कॅरेटचा हिऱ्यांचा हार लंपास, 95 वर्षांचा शाही इतिहास! ऑस्ट्रियातील घटनेनं खळबळ; इंटरपोलकडून चोरट्यांचा शोध सुरु

Goa PSC Chairman Appointment: 'गोवा लोकसेवा' अध्यक्ष नियुक्तीला हायकोर्टात आव्हान; राज्य सरकारसह उदयसिंह रावराणे यांना नोटीस

खरी कुजबुज: कलियुगातील 'लव-कुश'

SCROLL FOR NEXT