Ration Card Holders Dainik Gomantak
गोवा

Goa Scam : मोठा घोटाळा उघड; गोव्यातील रेशनधान्याची कर्नाटकात विक्री; 6 जण गजाआड

गुप्त माहितीच्या आधारे अन्नपुरवठा खात्याच्या अधिकाऱ्यांनी छापा टाकत पणजी, सांगे आणि कुंडईतील गोदाम सील केली आहेत.

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Scam : गोव्यात तूरडाळ आणि साखर घोटाळ्यानंतर आता आणखी एक मोठा घोटाळा समोर आला आहे. गोवा अन्न पुरवठा खात्याच्या गोदामातून तांदूळ आणि गव्हाची चोरी केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणात आतापर्यंत पोलिसांनी 6 जणांना ताब्यात घेतलं असून मुख्य सूत्रधार मात्र फरार होण्यात यशस्वी झाला आहे.

गोव्यात नुकत्याच गाजलेल्या तूरडाळ आणि साखर घोटाळ्यानंतर गोव्यात तांदुळ आणि गव्हाचा घोटाळा झाला आहे. राज्यात रेशनदुकानांवर वितरणासाठी आलेल्या धान्याची शेजारच्या कर्नाटक राज्यात नेऊन विक्री होत असल्याचं तपासातून स्पष्ट झालं आहे. आतापर्यंत किती धान्य गोव्यातून बाहेरच्या राज्यात नेण्यात आलंय याची ठोस आकडेवारी मिळाली नसली तरी या गोदामातून जवळपास 22 टन तांदूळ आणि गहू जप्त करण्यात आले आहेत.

गुप्त माहितीच्या आधारे अन्नपुरवठा खात्याच्या अधिकाऱ्यांनी छापा टाकत पणजी, सांगे आणि कुंडईतील गोदाम सील केली आहेत. इतकंच नाही तर ट्रक आणि मालवाहू रिक्षाही पोलिसांनी जप्त केली आहे. आतापर्यंत सहा जणांना पकडण्यात पोलिसांना यश आलं असून तब्बल 722 टन धान्य जप्त करण्यात आलं आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

निसर्गाच्या कुशीत वसलेले 'तळावली': हिरवाईनं नटलेल्या, इतिहासाच्या पाऊलखुणा जपणाऱ्या गावाची अनोखी ओळख!

Budhaditya Rajyog 2026: व्यापाऱ्यांना मोठा नफा, नोकरदारांना पगारवाढ! बुधादित्य योग 4 राशींना करणार मालामाल; सुवर्णकाळाचा थरार

Viral News Fact Check: मुबलक जांभळे म्हणजे 'दुष्काळाची चाहूल'? सोशल मीडियावर मेसेज होतोय व्हायरल, तज्ज्ञांनी दिलं स्पष्टीकरण

Egg Price Hike: 'ब्रॉयलर' अंडी खाऊ लागली भाव; 90 रुपये डझनने विक्री, 5 महिन्यांनंतर दरवाढ; उकाड्याचा परिणाम

Shreyanka Patil: हवेत चित्त्यासारखी झेप अन् चेंडूवर पकड... श्रेयंकाच्या 'सुपरमॅन' कॅचनं सोशल मीडियावर लावली आग Watch Video

SCROLL FOR NEXT