Grain Scam Dainik Gomantak
गोवा

Panjim: धान्यसाठा घोटाळा प्रकरण; बोरकरने घेतला अर्ज मागे

नागरी पुरवठा खात्याच्या गोदामातील धान्यसाठा घोटाळा प्रकरणी संशयित सचिन नाईक बोरकर याने कारवाईस आव्हान दिले होते , मात्र आता त्याने आर्ज मागे घेतला.

दैनिक गोमन्तक

Panjim: नागरी पुरवठा खात्याच्या गोदामातील धान्यसाठा घोटाळा प्रकरणी गुन्हे शाखेने जप्त केलेल्या सुमारे 1.044 पोती धान्याच्या विक्रीसाठी जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशाला संशयित सचिन नाईक बोरकर याने पणजी जिल्हा व सत्र न्यायालयात आव्हान दिले आहे. त्यावरील सुनावणीवेळी काल हा अर्ज तांत्रिक कारणावरून बोरकर याने अर्ज मागे घेतल्याने अतिरिक्त सत्र न्यायालयाने तो निकालात काढला.

नव्याने अर्ज दक्षिण न्यायालयात सादर केला जाणार आहे. संशयित बोरकर याच्याविरुद्ध गुन्हे शाखेने दाखल केलेल्या सर्व प्रकरणांमध्ये त्याला सशर्त जामीन मिळाला आहे. पोलिसांनी जो धान्यसाठा जप्त केला, तो नागरी पुरवठा खात्याच्या गोदामातील नव्हता, हे यापूर्वीच सरकारने मान्य करून खात्याला क्लिन चीट दिली आहे.

त्यामुळे हा धान्यसाठा स्वस्त धान्य दुकानधारकांकडून त्याने घेतला असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त करत पुढील तपास सुरू केला असला तरी अजून त्यातही ठोस पुरावे मिळू शकलेले नाहीत.

दरम्यान, संशयिताविरुद्ध क्राईम ब्रँचने तीन वेगवेगळे गुन्हे नोंद केले होते. हे गुन्हे दक्षिण गोवा क्षेत्रातील असल्याने उत्तर गोवा सत्र न्यायालयाने अर्जदाराला तेथे अर्ज सादर करावेत अन्यथा अर्ज फेटाळण्यात येईल, असे स्पष्ट केले.

तांत्रिक कारणावरून अर्जदाराच्या वकिलांनी तो मागे घेत असल्याचे स्पष्ट केले. दक्षिण गोव्यात उद्या नव्याने तीन वेगवेगळ्या प्रकरणांत धान्यसाठा परत करण्याच्या मागणीसाठी अर्ज केले जाणार आहेत.

गुन्हे शाखेने जप्त केलेल्या धान्य साठ्याची नासाडी होऊ नये म्हणून उत्तर गोवा जिल्हाधिकाऱ्यांनी त्याची विक्री करण्याचे निर्देश दिले आहेत. पोलिसांनी नागझर, कुर्टी व बोरी येथील खासगी गोदामांतून सुमारे 10 लाखांचा धान्यसाठा जप्त केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT