CM Pramod Sawant
CM Pramod Sawant Dainik Gomantak
गोवा

Goa Mining: एका खाण मालकाला 10 किमी पेक्षा जास्तीचा परिसर घेता येणार नाही; CM प्रमोद सावंत

दैनिक गोमन्तक

गोवा: खाण क्षेत्रात गोवा मागे राहणार नाही. सरकार 4 ते 6 महिन्यांत खाणकाम पुन्हा सुरू करेल आशी घोषणा मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केली. पुढील 4-6 महिन्यांत लिलावाच्या मार्गाने सरकार राज्यातील खाण उपक्रम पुन्हा सुरू करेल.

(Govt will resume mining activities in the state by the way of auction in next 4-6 months)

तसेच पीएम मोदी ऑक्टोबर 2022 मध्ये मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन करतील; गोव्याला भारताची पर्यटन राजधानी बनवण्याचे आमचे लक्ष्य आहे; असे ते म्हणाले, लवकरच गोव्यात खाण उद्योग पुन्हा सुरु करण्याचे संकेत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिले आहेत. खाण लिलाव येत्या 4 महिन्यात पूर्ण झाला तर 5 महिन्यात खाणी पुन्हा सुरु करणार अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे. मात्र या खाणींच्या लिलावादरम्यान एका मालकाला 10 किमी पेक्षा जास्तीचा परिसर घेता येणार नाही.

लिलावात स्थानिक कंपन्यांना प्राधान्य देण्याची मागणी फातोर्ड्याचे आमदार विजय सरदेसाई यांनी केली होती. खाण अवलंबितांनी नुकतीच गोवा फॉरवर्डचे सर्वेसर्वा आणि फातोर्ड्याचे आमदार विजय सरदेसाई यांची भेट घेतली होती. यावेळी खाणप्रश्नी आवाज उठवणार असल्याचं ग्वाही सरदेसाईंनी अवलंबितांना दिली होती. विधानसभेत सरदेसाईंनी खाणप्रश्नी सरकारला थेट सवाल केला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी खाणी सुरु करण्याचे सरकारचे प्रयत्न सुरु असून येत्या 5 ते 6 महिन्यात खाणी सुरु करणार असल्याची माहिती दिली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Goa News: गोव्यात लैंगिक अत्याचाराचे आरोप असलेले मंत्री, पोलिसांवर राजकीय दबाव; इंडिया आघाडीचा आरोप

Ponda Murder Case: सांताक्रुज, फोंड्यात मामाकडून भाच्याचा खून

Canada PM Justine Trudeau: जस्टिन ट्रुडो यांच्यासमोर 'खलिस्तानी घोषणा'; भारताने कॅनडाच्या राजदूताला बोलावून नोंदवला निषेध

दोन महिन्यात कसे वाढवले 40 हजार फॉलोअर्स, गोव्याच्या इन्फ्लुएन्सरने शेअर केलं सिक्रेट

Sahil Khan Arrested: गोव्यासह पाच राज्यातून दिवस-रात्र प्रवास; बेटिंग घोटाळ्यात अडकलेला साहिल खान अखेर गजाआड

SCROLL FOR NEXT