एक्स्प्रेशनल व्हिलेजच्या माध्यमातून गोव्यातील गावांचा चेहरामोहरा बदलणार

मागासलेल्या गावांच्या विकासासाठी एक्स्प्रेशनल व्हिलेज ही संकल्पना राबवत आहोत. मुख्यमंत्री प्रमोद सावंत
CM Pramod Sawant
CM Pramod SawantDainik Gomantak

गोवा: पंतप्रधान मोदींनी एक्स्प्रेशनल डिस्ट्रिक्टच्या माध्यमातून मागासलेल्या जिल्ह्यांना पुढे आणण्यासाठी अभियान सुरु केलं. मात्र गोवा हे लहान राज्य असल्याने दोनच जिल्हे आपल्या राज्यात आहे. त्यामुळे आम्ही मागासलेल्या गावांच्या विकासासाठी एक्स्प्रेशनल व्हिलेज ही संकल्पना राबवत आहोत. असे विधान मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केले.

(The face of villages in Goa will change through Expressional Village)

CM Pramod Sawant
गावातील शाळांना स्वातंत्र्यसैनिकांची नावं देणार; मुख्यमंत्री सावंत यांची मोठी घोषणा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीयांना13 ते 14 ऑगस्ट दरम्यान घरोघरी राष्ट्रध्वज फडकावून किंवा प्रदर्शित करून 'हर घर तिरंगा' चळवळ मजबूत करण्याचे आवाहन केले. ट्विट करत ते म्हणाले की या चळवळीमुळे तिरंग्याशी आमचा संबंध अधिक दृढ होईल आणि त्यांनी नमूद केले की 22 जुलै 1947 रोजी राष्ट्रध्वज स्वीकारण्यात आला होता.

भारताच्या 75 व्या स्वातंत्र्यदिनी पणजी येथे मुख्यमंत्री सावंत यांनी तिरंगा फडकावला; रस्ते, हवाई, जल कनेक्टिव्हिटीसाठी सरकारने मास्टर प्लॅन तयार केला आहे; समाजातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत योजना घेऊन जात आहोत असे वक्तव्य मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केले. ते पुढे म्हणाले, भारत ही लोकशाहीची जननी आहे. दरम्यान, गोव्याच्या स्वातंत्र्यसैनिकांचं बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही. त्यांच्या स्मरणार्थ गावांमधील शाळांना हुतात्म्यांची नावं देणार अशी घोषणा त्यांनी केली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com