Indore, Madhya Pradesh  Dainik Gomantak
गोवा

गोरगरीबांचा पैसा गोवा, मुंबईत कॅसिनो & बार बालांवर उधळला; सरकारी बाबूचा करोडोंच्या निधीवर डल्ला

गोरगरीबांना ऑनलाइन पद्धतीने करायचा आर्थिक व्यवहार अयशस्वी झाल्यानंतर तो पैसा त्यांच्या आणि मित्रांच्या बँक खात्यात हस्तांतरित करायचा.

Pramod Yadav

Indore, Madhya Pradesh: शासनाच्या आर्थिक व्यवस्थापन कार्यालयातील एका सरकारी बाबूने करोडो रूपयांचा घोटळा केला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या लेखा शाखेतील सरकारी योजना आणि मदत निधीच्या लाभार्थ्यांच्या पैशांचा वापर या अधिकाऱ्यांने स्वत:च्या अय्याशीसाठी केला.

गोरगरीबांना ऑनलाइन पद्धतीने करायचा आर्थिक व्यवहार अयशस्वी झाल्यानंतर तो पैसा त्यांच्या आणि मित्रांच्या बँक खात्यात हस्तांतरित करायचा. मध्यप्रदेशच्या इंदूर येथील ही घटना आहे.

मिलाप चौहान असे या सरकारी अधिकाऱ्याचे नाव आहे. त्याने त्याची पत्नी, भावजय आणि जिल्हाधिकारी कार्यालयातील अन्य काही कर्मचाऱ्यांच्या खात्यातही बेकायदेशीररीत्या पैसे पाठवले. नंतर हे पैसे काढण्यात आले.

चार वर्षांपासून चौहान हा घोटाळा करत होते. अखेर हा गैरप्रकार उघडकीस आला असून, त्याला अटक करण्यात आलीय. जिल्हा प्रशासनाच्या आतापर्यंतच्या तपासात साडेचार कोटी रुपयांचा घोटाळा समोर आला आहे.

या पैशातून अधिकाऱ्याने महू येथे दीड कोटी रुपयांचे फार्म हाऊस खरेदी करण्यात आला असून तेथे स्विमिंग पूल बांधण्यात आला आहे.

या सरकारी अधिकाऱ्याने मुंबई आणि गोव्याच्या देखील अनेक ट्रीप केल्या असून त्याने तेथे बार गर्ल्स आणि कॉल गर्ल्सवर लाखो रुपये खर्च केले. त्याने सरकारी पैसा कॅसिनोमध्येही खर्च झाला.

या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी जिल्हाधिकारी इलैया राजा टी यांनी अतिरिक्त जिल्हाधिकारी राजेश राठोड यांच्या नेतृत्वाखाली समिती स्थापन केली आहे. तीन दिवस या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

बुधवारीही अतिरिक्त जिल्हाधिकारी राठोड यांनी घोटाळेबाज मिलाप याला जिल्हाधिकारी कार्यालयात चौकशीसाठी बोलावले. ज्यांच्या खात्यात त्याने पैसे जमा केले त्या मित्र आणि कर्मचाऱ्यांनाही चौकशीसाठी बोलावण्यात आले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील सरकारी पैशाच्या व्यवहारात अशा प्रकारची ही पहिलीच घटना आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील लेखा शाखेतून गेल्या चार वर्षांत सुमारे दोन हजार ऑनलाईन व्यवहार अयशस्वी झाले आहेत. या सर्वांची चौकशी करण्यात आली आहे. प्रत्येक व्यवहाराची छाननी केली जात आहे. प्रशासन आणि जिल्हा कोषागाराचे अधिकारीही यात गुंतले आहेत.

या आर्थिक घोटाळ्यात जिल्हा कोषागार कर्मचाऱ्यांचाही सहभाग असण्याची शक्यता आहे. कोषागारातील एक बाबूही मिलापच्या संपर्कात असायचा. काही तांत्रिक बिघाडामुळे अयशस्वी झालेल्या ऑनलाइन व्यवहारातून पैसे काढण्यासाठी आणि बिल पास करण्यासाठी नंतर तो जिल्हाधिकारी कार्यालयातील बाबू मिलाप यांना मदत करत असे, असे समजते. या दिशेनेही चौकशी समिती तपास करत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: 'ट्रेनच्या खिडकीतून बाहेर लटकणारे पाय अन्...'; चिमुकलीच्या व्हिडिओनं खळबळ; सोशल मीडियावर थरकाप व्हायरल

Sanjay Dutt Luxury Hotel In Goa: संजय दत्तचं गोव्यात आलिशान लक्झरी हॉटेल, उद्घाटनापूर्वीच रचला इतिहास; आंतरराष्ट्रीय स्तरावर ठरतंय चर्चेचा विषय

Vaidhriti Yoga: ऑफिसमध्ये वाद अन् प्रवासात नुकसान! सूर्य-चंद्राची अशुभ युती उडवणार झोप; वैधृती योग 'या' राशींसाठी ठरणार घातक

Delhi Student Protest: मुलांचा आक्रोश, अमानुष अत्याचार अन् रक्ताळलेलं 'आंदोलन'! शिक्षणातील लाल फितीविरुद्ध 'जेन-झी'चा आरपारचा रणसंग्राम

Anti Defection Law: सत्तेची चिता पेटवण्यासाठी निष्ठेचा बळी? राजकीय पक्षांतराच्या अनैतिक नाट्यावर ताशेरे; आमदार पळवणाऱ्या वृत्तीमुळे प्रादेशिक पक्षांचे अस्तित्व धोक्यात

SCROLL FOR NEXT