गोवा पोलिसांनी आमच्यावर हल्ला करण्यासाठी कुत्री सोडली; ड्रग तपासात आडकाठी, हैद्राबाद पोलिस आयुक्तांचे अनेक आरोप

हैद्राबाद पोलिस आयुक्त सी.व्ही आनंद यांनी गोवा पोलिस आणि येथील कार्यपद्धतीवर खळबळजनक आरोप केले आहेत.
Goa Hyderabad News
Goa Hyderabad NewsDainik Gomantak

Hyderabad City Commissioner CV Anand on Goa Police: अमली पदार्थ विरोधी कारवाईत गोवा पोलिस (Goa Police) आम्हाला सहकार्य करत नसल्याचा आरोप यापूर्वी देखील हैद्राबाद पोलिसांनी केला आहे.

भाजप नेत्या आणि टीकटॉक स्टार सोनाली फोगट (Sonali Phogat Case) यांचा संशयास्पद मृत्यू झाल्यानंतर त्यात समोर आलेल्या संशयित आरोपींची चौकशी अटक यात हा वाद पुन्हा समोर आला.

दरम्यान, गोवा पोलिस अमली पदार्थ विरोधी कारवाईत सहकार्य करत नाहीत, यासह त्यांनी हैद्राबाद पोलिसांवर हल्ला करण्याचा देखील प्रयत्न केला असा आरोप हैद्राबादच्या आयुक्तांनी केला आहे.

Goa Hyderabad News
Goa Drugs Case: फोंडा येथे 2 किलो गांजासह एकाला अटक

अलिकडेच हैद्राबाद पोलिस आयुक्त सी.व्ही आनंद (Hyderabad City Commissioner CV Anand) यांनी एका संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीत, गोव्यातील अमली पदार्थ कारवाई, त्यासंबधी अटक करण्यात आलेले आरोपी आणि गोवा पोलिस प्रशासन याबाबत मत व्यक्त केली आहेत. शिवाय त्यांनी काही खळबळजनक आरोप देखील केले आहेत.

"अमली पदार्थ विरोधी कारवाईसाठी सरकारचे सहकार्य महत्वाचे आहे. तेलंगणा सरकार यासाठी कट्टीबद्ध आहे, त्यामुळे पोलिसांना कारवाई करण्यास अडचण येत नाही.

गोव्यात पोलिस आणि सरकार अमली पदार्थ विरोधी कारवाई कडक केल्यास त्याचा पर्यटनावर परिणाम होईल असे सांगतात. त्यामुळे गोवा पोलिसांच्या कार्यपद्धतीवर संशय व्यक्त होतो." असे पोलिस आयुक्त सी.व्ही आनंद म्हणाले.

Goa Hyderabad News
Sonali Phogat Death Case: हैद्राबाद पोलिसांचे गोवा पोलिसांवर गंभीर आरोप

प्रितेश बोरकर, स्टिव्ह पीटर डिसुजा आणि एडविन नुनीस सध्या हैद्राबाद येथे अटकेत आहेत. दरम्यान, यांचे मास्टरमाईंड गोव्यात असण्याची शक्यता नाकारता येत नाही असेही आनंद यांनी या मुलाखतीत म्हटले आहे.

काही रशियन, नायजेरीन देखील गोव्यात अमली पदार्थांचा पुरवठा करतात. एवढेच नव्हे तर काही अमली पदार्थ चार्टर विमानाद्वारे देखील गोव्यात येतात असे आमच्या तपासात उघड झाले आहे. असाही खुलासा आनंद यांनी केला आहे.

गोवा पोलिसांकडून आम्हाला कधीच सहकार्य मिळाले नाही. आम्ही जेव्हा केव्हा संशयित आरोपीला अटक करण्यासाठी यायचो त्यावेळी पोलिसच संशयितांना टीप देऊन गायब व्हायला सांगायचे. त्यामुळे आता गोवा पोलिसांकडून मदत मागण्याची आम्हाला भीती वाटते. असे आनंद यांनी म्हटले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com