Goa Job Fraud Canva
गोवा

'Cash For Job' चे आणखी एक प्रकरण! शिक्षण खात्यात नोकरीच्या आमिषाने महिलेची फसवणूक; संशयितास अटक

Goa Government Job Scam: शिक्षण खात्यात सरकारी नोकरी देण्याच्या बहाण्याने नवेवाडे येथील एका महिलेची ४ लाख ३० हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी संशयित गोविंद मांजरेकर (वय ४२ वर्षे) याला वास्को पोलिसांनी आज सायंकाळी अटक केली.

गोमन्तक डिजिटल टीम

Cash For Government Job Scam

वास्को: शिक्षण खात्यात सरकारी नोकरी देण्याच्या बहाण्याने नवेवाडे येथील एका महिलेची ४. लाख ३० हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी संशयित गोविंद मांजरेकर (वय ४२ वर्षे) याला वास्को पोलिसांनी आज सायंकाळी अटक केली. दुसरा संशयित सूरज नाईक फरार असून त्याचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

नवेवाडे येथील साक्षी सुदर्शन केरकर (वय ३९ वर्षे) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, संशयित गोविंद मांजरेकर आणि सूरज नाईक (दोघेही रा. वास्को) यांनी केरकर यांना शिक्षण खात्यात ‘एमटीएस’ पदाची नोकरी देण्याचे आमिष दाखवून त्यांच्याकडून पैसे घेतले; परंतु नोकरी मिळाली नाहीच, शिवाय पैसेही परत न मिळाल्याने साक्षी यांनी पोलिसांत धाव घेतली.

वास्को पोलिसांनी सांगितले की, याप्रकरणी शनिवारी (ता. ९) रात्री उशिरा गुन्हा नोंद केला आहे. साक्षी केरकर यांना गोविंद आणि सूरज यांनी १ मार्च ते ३१ मे २०२३ या कालावधीत शिक्षण विभागात नोकरी देण्याची आमिष दाखवून त्यांच्याकडून ४ लाख ३० हजार रुपये घेतले होते. मात्र, नोकरीही दिली नाही आणि त्यांचे पैसेही परत केले नाहीत. अखेर तक्रार नोंदविल्यानंतर पोलिसांनी गोविंद आणि सूरज यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविला.

वास्कोचे पोलिस निरीक्षक कपिल नायक यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक कॅरी फर्नांडिस या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT