Govind Gaude Dainik Gomantak
गोवा

Govind Gaude: मंत्रिपदावरुन हटवताच गोविंद गावडे बंडखोरीच्या पावित्र्यात; पक्ष, सरकारचे आभार मानत दिला संघर्षाचा इशारा

Goa Politics News: "सत्ता आणि सत्य यापैकी एक निवडण्याची संधी मिळाली तर मी नेहमीच सत्याची निवड करेन," अशी प्रतिक्रिया गोविंद गावडे यांनी दिली आहे.

Pramod Yadav

पणजी: राजीनाम्याची संधी देऊन देखील मंत्रिपदावरुन पायउतार होण्यास नकार देणाऱ्या कला आणि संस्कृती तसेच क्रीडा मंत्री गोविंद गावडे यांची मंत्रिमंडळातून अखेर हकालपट्टी करण्यात आली आहे.

मुख्यमंत्र्यांकडे असणाऱ्या आदिवासी कल्याण खात्यात भ्रष्टाचाराचा आरोप केल्याने कारवाईची टांगती तलवार असणाऱ्या गावडेंना बुधवारी (१८ जून) बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. या कारवाईनंतर पक्ष आणि सरकारचे आभार मानत गावडे बंडखोरीच्या पावित्र्यात आले असून, संघर्षाचा इशारा दिला आहे.

गोविंद गावडे यांनी सोशल मिडियाच्या माध्यमातून एक पोस्ट करत प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. "दबलेल्या लोकांची बाजू घेतली याची पावती गोव्याच्या पवित्र क्रांतीदिनी मिळाली या पेक्षा मोठे भाग्य असूच शकत नाही. ज्या गोष्टीसाठी सरकारने ही भूमिका घेतली त्या संघर्षाचा आवाज होण्यासाठी मोकळे केले यासाठी मी माझा पक्ष आणि सरकाराचे आभार मानतो. सत्ता आणि सत्य यापैकी एक निवडण्याची संधी मिळाली तर मी नेहमीच सत्याची निवड करेन," अशी प्रतिक्रिया गोविंद गावडे यांनी दिली आहे.

प्रेरणा दिनाच्या कार्यक्रमात गोविंद गावडे यांनी मुख्यमंत्र्यांकडे असलेल्या आदिवासी कल्याण खात्यात भ्रष्टाचाराचा आरोप केला होता. कंत्राटदारांच्या फाईल पैसे घेऊन मंजूर केल्या जातात असे गावडे म्हणाले होते. या वक्तव्याची गंभीर दखल पक्ष आणि सरकारने घेतली होती. यानंतर गावडेंची मंत्रिमंडळातून गच्छंती निश्चित मानली जात होती. अखेर त्याला बुधवारी मूर्त स्वरुप मिळाले.

गोविंद गावडेंना मंत्रिमंडळातून वगळण्याचा निर्णय मुख्यमंत्री सावंत आणि पक्षाच्या समन्वयाने घेतल्याचे प्रदेशाध्यक्ष दामू नाईक म्हणाले. तसेच, येत्या आठ दिवसांत अनेक निर्णय घेण्याचे संकेतही त्यांनी दिले.

तर, केंद्रीय नेतृत्वाच्या मान्यतेनंतर गोविंद गावडे यांना हटविण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी स्पष्ट केले आहे. गावडेंच्या जागेवर कोण? याची कोणतीही माहिती मात्र मुख्यमंत्री सावंत यांनी दिलेली नाही.

राज्यात अनेक दिवसांपासून मंत्रिमंडळ फेरबदलाची चर्चा सुरु आहे. यासाठी अनेकांची नावे देखील समोर आली होती. आता गावडेंच्या गच्छंतीनंतर कोणाला मंत्रिपदाची लॉटरी लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, मंत्रिमंडळातून गच्छंतीनंतर गोविंद गावडे पुढे काय भूमिका घेणार याकडे देखील लक्ष लागून राहिले आहे. गावडे यांना मंत्रिपदावरुन हटविल्यास तीव्र प्रक्षोभाला सामोरे जावे लागेल असा इशारा गोविंद यांच्या समर्थकांनी दिला होता. त्यानंतर पक्ष शिस्तभंग केल्याने गावडेंना मंत्रिपदावरुन हटविण्यात आले आहे. त्यामुळे सरकारच्या या निर्णयानंतर तसेच गावडेंच्या पुढच्या भूमिकेचे काय राजकीय पडसाद उमटतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rishabh Pant Record: ऋषभ पंतने 'कॅप्टन कूल'चा रेकॉर्ड मोडला! आता क्रिकेटच्या देवाचा नंबर! करणार 'ही' मोठी कामगिरी

WWE सुपरस्टारची गोळ्या घालून निर्घृण हत्या, 18 वर्षांची कारकीर्द एका क्षणात संपली

Wild Vegetables: पावसाळ्यातील किमया! गोव्यातील चविष्ट रानभाज्या..

'कोणतरी मरत नाही तोपर्यंत सरकार लक्ष देणार नाही'; मनसे नेत्याने शेअर केला कशेडी बोगद्याचा धक्कादायक व्हिडिओ

Shravan 2025: 'श्रावण सोमवार' व्रत करणार असाल तर 'हे' नक्की वाचा! काय करावं, काय टाळावं? पूजेचे संपूर्ण नियम

SCROLL FOR NEXT