Daji Salkar, Goa BJP Dainik Gomantak
गोवा

Goa BJP: दामूंविषयीचे वक्त्यव्य गावडेंना पडणार महाग? पक्षशिस्तीनुसार होणार कारवाई; साळकरांनी दिला इशारा

Govind Gaude: गावडे यांना बोलावून घेऊन त्यांचे म्हणणे जाणून घेतील आणि पक्षशिस्तीनुसार त्यांच्यावर कोणती कारवाई करावी याचा निर्णय घेतील, असे भाजपचे आमदार दाजी साळकर यांनी येथे पत्रकार परिषदेत सांगितले.

Sameer Panditrao

पणजी: प्रियोळचे आमदार गोविंद गावडे यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांच्या विषयी केलेल्या वक्तव्याची भाजपने दखल घेतली आहे. प्रदेशाध्यक्ष उद्या, परवा राज्यात आल्यानंतर गावडे यांना बोलावून घेऊन त्यांचे म्हणणे जाणून घेतील आणि पक्षशिस्तीनुसार त्यांच्यावर कोणती कारवाई करावी याचा निर्णय घेतील, असे भाजपचे मुख्य प्रवक्ते आमदार दाजी साळकर यांनी येथे पत्रकार परिषदेत सांगितले.

भाजपचे प्रदेश सरचिटणीस सिद्धार्थ कुंकळ्येकर म्‍हणाले, ‘गावडे यांच्यावर पक्षाने योग्य ती कारवाई यापूर्वीच केली आहे. आताही पक्षाच्या धोरणानुसार कारवाई होईल’. सरचिटणीस सर्वानंद भगत म्‍हणाले, ‘हा भाजपचा अंतर्गत विषय असून पक्षाच्या नियमांनुसार नक्‍कीच कारवाई होईल’.

आमदार विजय सरदेसाई यांनी प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांच्यावर केलेल्या वक्तव्यानंतर त्याला उत्तर देण्यासाठी सायंकाळी उशिरा तातडीने बोलावण्यात आलेल्या या पत्रकार परिषदेत त्यांना गावडे यांनी केलेल्या वक्तव्याबाबत विचारणा केली असता सुरवातीला आजची पत्रकार परिषद ही सरदेसाई यांच्या वक्तव्यापुरतीच मर्यादित आहे, असे सांगण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर सरदेसाई यांनीही ‘गावडे यांच्यावर कारवाईची हिंमत दामू दाखवणार का’, अशी विचारणा केल्याने ते प्रश्न संबंधितच आहेत, असे दाखवून दिल्यानंतर तिघांनीही वरील उत्तरे दिली.

तत्पूर्वी, सरदेसाई यांनी केलेल्या वक्तव्याला उत्तर देताना साळकर म्हणाले, ‘फातोर्डा येथे झालेल्या भाजपच्या मेळाव्‍यामुळे सरदेसाई बिथरले आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून अशा वक्त्यव्याची अपेक्षा होतीच. एका मतदारसंघापुरता शिल्लक राहिलेल्या पक्षाच्या आमदाराने जगातील सर्वांत मोठा राजकीय पक्ष भाजपच्या प्रदेशाध्यक्षावर बोलताना १० वेळा विचार केला पाहिजे.

अहंकार किती शिगेला पोहोचला आहे, हे दर्शवणारे त्यांचे वक्तव्य आहे. दामू यांनी सर्व जुन्या- नव्या कार्यकर्त्यांना एकत्र आणत ४० मतदारसंघांत मेळावे घेतले. ते फातोर्ड्यातून पराभूत झाले असले तरी त्यांची मते वाढत गेली; कारण त्यांनी मतदारसंघातील स्वाभिमानी फातोर्डावासीयांसाठी काम करणे सोडलेले नाही, अशा दामूंवर टीका म्हणजे स्वाभिमानी फातोर्डावासीयांचा अपमान आहे’.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vasco ATM Scam: एटीएममध्ये पैसे भरणारेच निघाले चोर! खासगी कंपनीच्या 5 कर्मचाऱ्यांनी लंपास केले 14 लाख; वास्कोतील धक्कादायक प्रकाराने खळबळ

Goa Tiger Symbolism: वाघाच्या पुढच्या 2 पायांमध्ये रानडुक्कर, तर मध्ये छोटेखानी सिंह; वागऱ्यागाळ येथील वैशिष्ट्यपूर्ण मूर्ती

Vaibhav Suryavanshi Century: 15 षटकार 11 चौकार...! 32 चेंडूत शतक ठोकत रचला इतिहास, कतारमध्ये 14 वर्षीय वैभव सूर्यवंशीचं वादळ VIDEO

Viral Video: भर रस्त्यात काकाची 'दारु पार्टी'! कुणाचीही हटवण्याची हिंमत नाही, व्हिडिओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल; नेटकरी म्हणाले, "काका ऑन रॉक"

VIDEO: बुमराहच्या तोंडून निघाली शिवी, बावुमाच्या उंचीवर केलेलं वक्तव्य व्हायरल; म्हणाला, 'बौना भी तो है यह...'

SCROLL FOR NEXT