Sreedharan Pillai Dainik Gomantak
गोवा

आदिवासी बहुल राज्‍यांसाठी केंद्राकडून अंदाजपत्रकात 10 टक्के तरतूद

कल्‍याणकारी योजनांद्वारे गरिबी हटाव!

दैनिक गोमन्तक

काणकोण : भारताच्या स्वातंत्र्यानंतर गरिबी हटाव सारख्या अनेक घोषणा झाल्या. मात्र, त्याची कार्यवाही योग्य प्रकारे झाली नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी ईशान्येकडील राज्यांसाठी अंदाजपत्रकात दहा टक्के खर्चाच्‍या कल्याणकारी योजना राबविण्यासाठी तरतूद केली आहे. त्याची कार्यवाही सुरू आहे. ही सर्व राज्ये आदिवासी (Tribal) बहुल राज्ये आहेत, असे राज्यपाल (Governor) श्रीधरन पिल्लई यांनी सांगितले.

आमोणे-पैंगीण येथील आश्रम शाळेच्या वैद्यकीय खर्चासाठी राज्यपाल श्रीधरन पिल्लई यांनी राज्यपाल निधीतून आश्रम शाळेला 5 लाख रुपयांचा निधी आज शाळेच्या वास्तूचे उद्‍घाटन केल्यानंतर जाहीर केला. गोवा राज्यात लोकसंगीत व लोकगीताने समृद्ध आहे. मिझोरामात राज्यपाल म्हणून कार्यरत असताना तेथील लोकसंगीत व लोकवेदाचा अभ्यास केला. त्याचे पुस्तक रूपाने प्रकाशन शनिवारी राज्यभवनावर करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

लोकोत्‍सवचे उद्‍घाटन

आमोणे- पैंगीण येथील आदर्शग्रामात उभारलेल्या आश्रम शाळा व तीन दिवशीय लोकोत्सव 2021 चे राज्यपालांच्या हस्ते काल उद्‍घाटन करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री प्रमोद सावंत (Pramod Sawant) हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी जिल्हा पंचायत सदस्य शोभना वेळीप, पैंगीणचे सरपंच जगदीश गावकर, माजी मंत्री रमेश तवडकर यांची उपस्थिती होती. तसेच आदिवासी कल्याण खात्याच्या संचालिका त्रिवेणी वेळीप, उपसंचालिका नीना नाईक, आदिवासी कल्याण खात्याचे सचिव रवी धवन व अरूणाचल प्रदेशचे भोज यांच्‍यासह अन्‍य मान्‍यवर उपस्थित होते.

आश्रम शाळेसाठी 35 कोटी खर्च : मुख्‍यमंत्री

यावेळी मुख्यमंत्री प्रमोद सावंत (Pramod Sawant) म्‍हणाले, राज्यातील पहिली आश्रम शाळा 35 कोटी रूपये खर्चून काणकोणात उभी राहिली आहे. या शाळेत पेडणे ते काणकोण व वास्को ते धारबांदोडापर्यंतचे विद्यार्थी प्रवेश मिळविण्यासाठी प्रयत्नशील असतील. पायाभूत सुविधा देतानाच सबळ मनुष्यबळ निर्माण करण्याचा सरकारचा प्रयत्न आहेत. थोड्याच कालावधीत आदिवासी संग्रहालय व आदिवासी संशोधन केंद्राची स्थापना राज्यात करण्यात येणार आहे. समाजाच्या अंत्योदय गटापर्यत पोहोचण्याचा भाजप सरकारचा प्रयत्न आहे. मात्र, गेल्या दीड वर्षांत कोरोना महामारीमुळे त्यामध्ये व्यत्यय आल्‍याची खंत मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केली. यावेळी मुख्‍यमंत्र्यांनी माजी मंत्री व जाती जमातीचे आयुक्त रमेश तवडकर यांनी 2012 पासून आश्रम शाळेसाठी केलेल्या प्रयत्नांबद्धल त्यांनी तवडकर यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT