governor Sreedharan Pillai gave patience to the people in the rural areas Dainik Gomantak
गोवा

ग्रामीण भागातील जनतेला राज्यपालांनी दिला धीर

शहरांबरोबरच गावांचाही विकास व्हावा - राज्यपाल

दैनिक गोमन्तक

राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांनी आपल्या पत्नी श्रीमती रिता पिल्लई यांच्यासोबत “संपूर्ण गोवा यात्रा” कार्यक्रमाचा एक भाग म्हणून तिसवाडी तालुक्यातील दिवाडी बेटास भेट दिली. राज्यपालांनी प्रथम नावेली (Navelim) दिवाडी येथील श्री गणेश मंदिर येथे आणि नंतर अवर लेडी ऑफ पायटी चर्च गोल्ति, पियेदाद दिवाडी येथे भेट दिली आणि प्रार्थना केली.

यावेळी बोलताना राज्यपालांनी गोव्याच्या समृध्द संस्कृतीची प्रशंसा केली. गोव्यातील लोक मनाने चांगले आहेत. जेंव्हा मी गोव्यातील मंदिरे आणि चर्चेसना भेट देतो, तेंव्हा मला विविधतेत एकता आणि परंपरेचे दर्शन घडते. गोव्यात विविध जाती-धर्माचे लोक एकमेकांशी चांगले वागतात असे राज्यपालांनी सांगितले.

राज्यपालांनी संपूर्ण गोवा (goa) कार्यक्रमाचा उद्देश सांगताना लोकांचे वास्तव जीवन गावात दिसते असे सांगितले. शहरे विकसित होत आहेत हे चांगले आहे. पण, शहरांबरोबरच गावांचाही विकास व्हायला हवा. लोकशाहीत लोक सर्वोच्च आहेत आणि गोव्यातील जनतेची सेवा करण्याचे कर्तव्य पार पाडताना मला खूप आनंद होत आहे अशी टीपण्णी त्यांनी यावेळी केली.

राज्यपाल (Governor) पीएस श्रीधरन पिल्लई यांनी गोलती-नावेली आणि मथियास-मळारच्या सरपंच आणि पंच सदस्यांशी संवाद साधला आणि विविध विषयांवर चर्चा केली. राज्यपालांनी ग्रामस्थांना त्यांचे प्रश्न नवीन सरकारकडे मांडण्याचे आश्वासनही दिले. आणि गोव्यातील लोकांच्या भल्यासाठी आपण कठोर परिश्रम करणार असल्याचे प्रतिपादन केले. राज्यपालांनी नावेली येथील श्रीगणेश मंदिरात प्रार्थना करून आशीर्वाद घेतले. त्यानंतर त्यांनी अवर लेडी ऑफ पायटी चर्च, गोलती पियेदाद दिवाडीला भेट दिली.

यावेळी आमदार (MLA) राजेश फळदेसाई, गोलती-नावेली पंचायतीचे सरपंच मारियो पिंटो, सां-माथियासचे सरपंच मोहन वळवईकर, इतर पंच सदस्य, राज्यपालांचे सचिव मिहिर वर्धन आणि इतर अधिकारी उपस्थित होते. यावेळी राज्यपालांनी दिवाडीच्या लार सांता मारगारिदा संस्थेस आणि ओमश्री शक्तिविनायक देवस्थानास तसेच एका डायलीसिस रूग्णास आर्थिक मदत वितरीत केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT