Book Publication Gomantak Digital Team
गोवा

Book Publication : महात्मा गांधींची अहिंसा हेच खरे शौर्य : राज्यपाल

‘गांधीजी नांवाचो शूर मनीस’चे प्रकाशन

गोमन्तक डिजिटल टीम

Governor Sreedharan Pillai : सत्य, अहिंसा, स्वावलंबन, निर्भिडतेमुळेच उत्तम व्यक्तिमत्त्व घडते आणि तीच शौर्यत्वाची ओळख आहे, हा विचार गांधीजींनी जाणला आणि आयुष्यभर जपला, म्हणूनच ते सर्वार्थाने महात्मा होते. त्यांची हीच विचारसरणी नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी ''गांधीजी नांवाचो शूर मनीस'' हे पुस्तक मोलाचा हातभार लावेल, असा विश्वास राज्यपाल श्रीधरन पिल्लई यांनी व्यक्त केला.

सहित प्रकाशन प्रकाशित आणि अनंत अग्नी अनुवादित पुस्तकाचे राजभवनात अनौपचारिक प्रकाशन केल्यानंतर ते बोलत होते. यावेळी ज्ञानपीठ विजेते प्रसिद्ध कोकणी लेखक दामोदर मावजो आणि पुस्तकाचे अनुवादक अनंत अग्नी यांची उपस्थिती होती. प्रसिद्ध लेखक राजाभाऊ शिरगुप्पे यांनी मूळ मराठीत हे पुस्तक लिहिले आहे. कोकणी साहित्याला प्रोत्साहन देण्यासाठी राजभवन नेहमीच प्रयत्नशील असल्याचे सांगून साहित्यातून आपली प्रादेशिक अस्मिता जपण्याचे आवाहन राज्यपाल श्रीधरन पिल्लई यांनी केले.

सदर पुस्तक महात्मा गांधींची सर्वसमावेशक विचारप्रणाली योग्य प्रकारे युवकांसमोर आणण्यासाठी उपयुक्‍त ठरेल. हे पुस्तक लोकांच्या मनात गांधींविषयी असलेल्या शंका दूर करेल. हिंसक मनोवृत्तीवर अहिंसक तत्वानेच यश प्राप्त करता येते, याची प्रचिती देणार हे पुस्तक युवा पिढीसाठी मार्गदर्शक ठरेल, असा विश्वास दामोदर मावजो यांनी व्यक्त केला.

गांधी विचार कोकणी भाषिक वाचकांपर्यंत!

गांधीजींचे विचार आणि त्यांचे जीवन कोकणी भाषिक वाचकांसाठी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने अनंत अग्नी यांनी अनुवादित केलेली ४०० सुविचारांची दोन पुस्तके कोकणी भाषा मंडळाने प्रकाशित केलेली आहेत. धर्मद्वेश, परस्पर द्वेश आणि सत्य-अहिंसेपासून दूर जाणाऱ्या समाजाला गांधी विचारांच्या प्रभावातून आपल्या संस्कृतीशी आणि सामाजिक बांधीलकीकडे जोडण्याच्या दृष्टीने गांधी विचार कोकणी भाषिक वाचकांपर्यंत आणण्याचा आपला मनोदय प्रकाशक किशोर अर्जुन यांनी व्यक्त केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Mining: आता डंप हाताळणी 'सावधानतेने'! डीपीआर आवश्यक; कोट्यवधींची बँक हमीही द्यावी लागणार

Goa Police: तीन पोलिस निलंबित, तर दोघांवर शिस्तभंग; गोळीबार, एडबर्ग मारहाण प्रकरणी कारवाई

सीमा, स्विटी, सरस्वती, रश्मी.... ब्राझीलमधील मॉडेलचा फोटो वापरून 10 बूथवर 22 वेळा मतदान; राहुल गांधी यांचा नवा खुलासा

SPPU Rice Research: साध्या तांदळालाही 'बासमती'चा सुवास, जनुकीय बदलानंतर नवे वाण विकसित; 'एसपीपीयू'चे अनोखे संशोधन

Mapusa: 'पाकिस्तान झिंदाबाद', डिजिटल बोर्डमुळे गोंधळ; दोन आस्थापनांच्या 9 कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल; हडफडे, कळंगुटमधील प्रकार

SCROLL FOR NEXT