Rajendra Arlekar Dainik Gomantak
गोवा

Governor Rajendra Arlekar : वाडेनगर शिक्षण सेवा प्रतिष्ठित शिक्षण संस्था उदयास येत आहे.

राज्यपाल राजेंद्र आर्लेकर ः शिक्षक,कर्मचाऱ्यांच्या कठोर परिश्रमामुळे यश

गोमन्तक डिजिटल टीम

Governor Rajendra Arlekar : नवेवाडे येथे प्राथमिक विभाग, माध्यमिक शाळा आणि उच्च माध्यमिक चालवणारे वाडेनगर शिक्षण सेवा मंडळ (व्हीएनएसएसएम) राज्यातील एक प्रतिष्ठित शैक्षणिक संस्था म्हणून उदयास येत आहे. शिक्षक, कर्मचारी आणि त्यांचे व्यवस्थापन यांच्या समर्पित, कठोर परिश्रम आणि अथक प्रयत्नांमुळे ते शक्य झाले आहे, असे प्रतिपादन बिहारचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी केले.

गेली ३५ वर्षे शाळेची सेवा करणाऱ्या वाडेनगर शिक्षण सेवा मंडळ उच्च माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापिका अनघा देशपांडे आर्लेकर यांच्या निरोप समारंभप्रसंगी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. शाळेच्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाला नगरसेवक सुदेश भोसले, वाडे नगर शिक्षण सेवा मंडळ व्यवस्थापक मंजुनाथ पै, मुख्याध्यापिका उमा देसाई, प्राथमिकच्या मुख्याध्यापिका रंजना नाईक, अमोघ आर्लेकर, वरदा आर्लेकर आणि इतर उपस्थित होते.

आर्लेकर पुढे म्हणाले की, अनघा देशपांडे आर्लेकर यांनी केवळ शिक्षिकेची भूमिकाच केली नाही, तर ती एक चांगली आई, चांगली पत्नीही आहे.वाडे नगर शिक्षण सेवा मंडळ केवळ अनघा आर्लेकर यांच्या अथक परिश्रमामुळे उच्च माध्यमिक शाळा सुरू करून उंच उड्डाण करू शकले. एनसीसी कॅडेट्स, नौदल आणि लष्करी दोन्ही शाखा सुरू करण्यामागे त्यांचा हात होता ,असे आर्लेकर म्हणाले. राज्यपाल आर्लेकर यांनी शिक्षकांना अनघा आर्लेकर यांचा वारसा पुढे नेण्याचे आवाहन केले.

नगरसेवक सुदेश भोसले यांनी सांगितले,की वाडे नगर शिक्षण सेवा मंडळ सदैव विद्यार्थ्यांना देशभक्तीचे धडे देत आहे. सूत्रसंचालन सुवर्णा बांदेकर व अश्विनी कवळेकर यांनी केले. अपर्णा मयेकर यांनी आभार मानले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pilgao Farmers Protest: पिळगावमधील महिला उतरल्या रस्त्यावर! सरकारसह लोकप्रतिनिधी लक्ष्य; खनिज वाहतूक बंदच

Indian Coast Guard: अंदमानजवळ बोटीतून सहा हजार किलोचे अमली पदार्थ जप्त, तटरक्षक दलाची कारवाई

Sattari: सत्तरी तालुका लवकरच टँकरमुक्त! आमदार राणे यांचा निर्धार; वेळुस येथे 1.5 कोटींच्या कामाची पायाभरणी

Goa Live News: बुमराहच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा 295 धावांनी विजय

Sivakarthikeyan At IFFI: 'पोलिस व्हायचे होते पण.. '; Amaran Star ची Inspiring Journey, सभागृहात टाळ्याशिट्ट्यांची बरसात

SCROLL FOR NEXT