Mhadai Tiger project : सेव्ह म्हादई, व्याघ्र प्रकल्प समर्थकांचे काणकोण पालिका,पंचायतींना निवेदन

पंचायतीनी ग्रामसभेत व पंचायत मंडळाच्या बैठकीत म्हादई बचाव व व्याघ्रप्रकल्पासंदर्भात ठराव घेऊन तो सरकारला सादर करावा
व्याघ्रप्रकल्प
व्याघ्रप्रकल्पDainik gomantak
Published on
Updated on

Mhadai Tiger project : सेव्ह म्हादई व व्याघ्र प्रकल्प समर्थन गटाच्या सदस्यांनी आज काणकोण मधील पंचायती व पालिकेला समर्थन देण्यासाठी निवेदन सादर केले.या गटात जनार्दन भंडारी, विकास भगत,राजन घाटे,मारियानो फेर्रांव यांनी सह्यानिशी हे निवेदन दिले.निवेदनात पंचायतीनी ग्रामसभेत व पंचायत मंडळाच्या बैठकीत म्हादई बचाव व व्याघ्रप्रकल्पासंदर्भात ठराव घेऊन तो सरकारला सादर करावा,अशी विनंती केली आहे.

म्हादई नदी राज्याची जीवन दायीनी आहे त्याशिवाय सलीम अली पक्षी अभयारण्य, बोंडला अभयारण्य, म्हादई अभयारण्य व मोले राष्ट्रीय उद्यान हे या नदीच्या अखत्यारीत येतात.कर्नाटकने पाणी वळविल्यास त्याचा अनिष्ट परिणाम येथील जीव सृष्टीवर होणार आहे.

व्याघ्रप्रकल्प
Mhadei Issue - सरकारने म्हादईच्या मुद्द्यावर राजकारण करु नये | Gomantak TV

केंद्र सरकारने कर्नाटक सरकारला दिलेला कळसा भंडुरा प्रकल्पाचा डीपीआर त्वरित मागे घेण्यासबंधी व म्हादई अभयारण्य व्याघ्र प्रकल्पासाठी घोषित करण्याची मागणी करणारा ठराव पंचायत व पालिकेने घेऊन तो केंद्र सरकार, पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंत,वनखाते, म्हादई बचाव आंदोलनाच्या निमंत्रक निर्मला सावंत,

व्याघ्रप्रकल्प
Mhadei - म्हादई वळवण्यास कर्नाटकला मंजुरी मिळू शकत नाही - मुख्यमंत्री | Gomantak Tv

जलस्त्रोत खाते,पर्यावरण व हवामान बदल खाते यांना पाठवून देण्याची मागणी केली आहे. आज या गटाने सर्वच पंचायतीत जाऊन निवेदन सादर केले काही पंचायतीचे सरपंच अनुपस्थित राहिल्याने गटाच्या सदस्यांनी निवेदन पंचायत सचिवांना सादर केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com