Mhadai Water Dispute: म्हादई वाचवण्यासाठी 'हा' प्रकल्प महत्वाचा, अन्यथा राज्याचे अस्तित्व धोक्यात

राजन घाटे : पंचायतींना देणार निवेदन
Save Mhadai
Save MhadaiDainik Gomantak

Mhadai Water Dispute: म्हादईचा प्रश्‍न निकाली काढण्यासाठी राज्यात व्याघ्र प्रकल्पाची नितांत गरज आहे. त्यासाठी राज्यभरातून सर्व पंचायतींनी ठराव घेऊन त्या ठरावाच्या प्रती सेव्ह म्हादई, सेव्ह गोवा या संघटनेला व सरकारला पाठवाव्यात, असे आवाहन करीत बुधवारी (ता.25) सायंकाळी पेडण्यात त्यासंदर्भात सभा होणार असल्याची माहिती राजन घाटे यांनी दिली.

आझाद मैदानावर मंगळवारी झालेल्या पत्रकार परिषदेस मारियानो फेर्रांव, पेडण्याचे सदानंद वायंगणकर, अनिल लाड यांची उपस्थिती होती.

घाटे म्हणाले, व्याघ्र प्रकल्प झाल्यास कर्नाटक म्हादईचे पाणी वळवूही शकत नाही, त्यासाठी राज्य सरकारवर दबाव वाढविला पाहिजे. काही मूठभर नेत्यांचा त्याला विरोध आहे.

वाघामुळे राज्यातील म्हादई अभयारण्याचे संरक्षण होणार आहे. आपल्या राज्यात वाघच नाही, असे सांगणे चुकीचे आहे. कर्नाटकचे म्हादईवरील अतिक्रमण रोखण्यासाठी हा प्रकल्प अत्यंत गरजेचा आहे.

Save Mhadai
Colvale Jail: कोलवाळ कारागृह ‘स्वयंपूर्णते’च्या दिशेने

पेडण्यातील सभेला लोकांनी उपस्थित राहून या प्रकल्पाच्या होत असलेल्या मागणीस पाठिंबा द्यावा, असे आवाहन घाटे यांनी केले. उद्या, बुधवारी सकाळी कोरगाव पंचायतीला निवदेन दिल्यानंतर तालुक्यातील सर्व पंचायतींना ते दिले जाणार आहे.

त्यानंतर सर्वात शेवटी पेडणे नगरपालिकेस निवदेन दिल्यानंतर जाहीर सभा होईल, असे त्यांनी नमूद केले. राज्यातील सर्व पंचायतींपासून महिला मंडळांनी व्याघ्र प्रकल्पाची मागणी लावून धरावी, असे आम्ही आवाहन करीत आहोत.

हा प्रकल्प झाला नाहीतर राज्याचे अस्तित्व धोक्यात येऊ शकते. जल, जमीन आणि जंगल वाचवायचे असेल तर व्याघ्र प्रकल्प निर्माण झालाच पाहिजे.

- राजन घाटे, सामाजिक कार्यकर्ते

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com