हिमाचल प्रदेशाचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर  
गोवा

हिमाचल प्रदेशाचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर गोव्यात

देव दामोदराने देशावर येणारे संकट दूर करावे अशी प्रार्थना राजपाल राजेंद्र आर्लेकर यांनी केली.

दैनिक गोमन्तक

देव दामोदराच्या कृपेने मला देशसेवा करण्याचे भाग्य लाभले. माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला राज्यपाल पद मिळाले. त्या पदाचा मान सन्मान योग्यरित्या सांभाळणार असल्याचे प्रतिपादन हिमाचल प्रदेशाचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी केले. हिमाचल प्रदेशाचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी आज सोमवारी वास्को ग्रामदैवत दामोदराचे दर्शन घेतले. (Governor of Himachal Pradesh Rajendra Arlekar in Goa)

यावेळी जोशी कुटुंबातील प्रशांत जोशी, श्री दामोदर भजनी सप्ताह समितीचे अध्यक्ष जगदीश दुर्भाटकर तसेच इतर पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते. श्री दामोदर मंदिराचे मुख्य पुरोहित भूषण जोशी यांनी या प्रसंगी श्रीचरणी सार्वजनिक सांगणे केले. पुढे बोलताना राज्यपाल आर्लेकर म्हणाले की देशात मुसळधार पावसामुळे बहुतेक ठिकाणी भूस्खलन होऊन जीवितहानी झाली असून, यामुळे अनेकांना मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. देव दामोदराने देशावर येणारे संकट दूर करावे अशी प्रार्थना राजपाल राजेंद्र आर्लेकर यांनी केली .

याप्रसंगी उद्योजक प्रशांत जोशी यांनी हिमाचल प्रदेश राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी गोवा पर्यटन उद्योगाचा विकास करण्यासाठी पुढाकार घ्यावा अशी मागणी केली. यावेळी प्रशांत जोशी यांच्या हस्ते राज्यपाल आर्लेकर यांचा गौरव करण्यात आला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: गोव्यात आला कामाच्या शोधात, सोबत आणला गांजा; ओडिशातील 29 वर्षीय युवकाच्या आवळल्या मुसक्या

Goa Politics: खरी कुजबुज; घोडा काँग्रेसच्या वाटेवर?

Goa Cricket: 8 चौकार, 3 षटकार! गोव्याच्या 'तनिषा'ची वादळी खेळी व्यर्थ; आंध्र प्रदेशचा 18 धावांनी विजय

Goa News: 28 गुन्ह्यांचे अपराधीकरण झाले रद्द! गोवा राज्य मंत्रिमंडळाचा महत्त्वपूर्ण निर्णय; तुरुंगवासाऐवजी दंडाची तरतूद

Nagarjuna At IFFI 2025: '..अजूनही देशात शिवा म्हणूनच हाक मारतात'! अभिनेते नागार्जुन यांचा दिलखुलास संवाद; उलगडला भावनिक प्रवास

SCROLL FOR NEXT